Chetan Bodke
चांगले आरोग्य राखण्यासाठी आपल्याला उत्तम प्रकारे जेवण करणं अत्यंत आवश्यक आहे.
जेवणामध्ये सर्वच जण मसाल्याचा वापर करतातच. त्यामुळे जेवण कसे रूचकर होईल, याकडे सर्वच लक्ष देतात.
मसाले आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. चांगले आरोग्य राखण्यासाठी मसाले खूप फायदेशीर आहेत.
न्यूट्रिशिएस्टने दिलेल्या माहितीनुसार, हृदय निरोगी ठेवण्यासाठी लसूण खूप फायदेशीर आहे. सोबतच लसूण जेवणाचीही चव वाढवते.
हळद चेहरा आणि हृदयासाठी खूप फायदेशीर मानली जाते. अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी हळद उत्तम आहे.
हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. हळद रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते.
हृदयासंबंधित अनेक आजारांसाठी दालचिनी आरोग्यदायी आहे. डायबिटीस रुग्णांना इन्शुलिन नियंत्रणात राहण्यासाठी दालचिनी फायदेशीर आहे.
अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी काळी मिरी फायदेशीर मानली जाते. अँटी ऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरीयल गुणधर्म असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोथंबिर फायदेशीर आहे. कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यासाठी कोथंबिर फायदेशीर ठरते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.