Bihar Crime News  Saam Tv
देश विदेश

Crime: ९ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, १३ वर्षांच्या मुलाचं भयंकर कृत्य; शेतात सापडला मृतदेह

Bihar Crime News : बिहारमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. १३ वर्षांच्या मुलाने ९ वर्षांच्या मुलावर बलात्कार करून तिची हत्या केली. शेतामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली.

Priya More

Summary:

  • बिहारमध्ये ९ वर्षांच्या मुलीची हत्या

  • बलात्कार करून करण्यात आली हत्या

  • १३ वर्षांच्या मुलाला पोलिसांनी केली अटक

बिहारमध्ये ९ वर्षांच्या मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. १३ वर्षांच्या मुलाने हे भयंकर कृत्य केले. आरोपीने मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील एका गावात घडली. पीडित मुलगी शनिवारपासून बेपत्ता होती. रविवारी सकाळी गावाजवळच्या मक्याच्या शेतामध्ये रक्ताच्या थारोळ्यात तिचा मृतदेह आढळून आला.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने विळ्याने मुलीचा गळा चिरल्याचे सांगितले. या घटनेनंतर बिहारमध्ये एकच खळबळ उडाली. हत्या करण्यात आलेली मुलगी शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही. रविवारी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ मुलीचा शोध सुरू केला. तर मक्याच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला.

पीडित मुलीची गळा चिरून हत्या करण्यात आली. घटनास्थळावरून पोलिसांनी काही कपडे जप्त केले. मुलीवर बलात्कार केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर सत्य समोर येईल. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं त्याने हत्येची कबुली दिली. मुलाला ड्रग्जचे व्यसन होते. हत्या करण्यात आलेल्या मुलीला याबद्दल माहिती होते. ती त्याच्या कुटुंबीयांकडे त्याची तक्रार करायची. याच रागातून मुलाने तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. पोलिस सध्या पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यात दहीहंडी उत्सवाला एकनाथ शिंदेंची उपस्थिती

Maharashtra Politics: शरद पवारांच्या जवळच्या नेत्याच्या अडचणी वाढल्या, 'ते' वक्तव्य भोवलं; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? त्या बॅनरने राज्यात घडामोडींना वेग

Government Jobs: खूशखबर! वयाची तिशी ओलांडल्यानंतरही मिळेल सरकारी नोकरी; कुठे -कुठे आहे संधी जाणून घ्या

Motha Mangalsutra Design: सणासुदीला आणि लग्नसमारंभात खुलून दिसेल लूक; पाहा 'या' ७ ट्रेंडी मंगळसूत्रांच्या डिझाइन्स

SCROLL FOR NEXT