DA HIKE Saam Tv
देश विदेश

7th Pay Commission: गुड न्यूज! केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा वाढणार, जाणून घ्या किती होणार पगार?

Latest News : येत्या काळामध्ये मोदी सरकार (Modi Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आहे.

Priya More

Delhi News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employee) खूपच महत्वाची बातमी आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (Dearness Allowance) 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. येत्या काळामध्ये मोदी सरकार (Modi Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकार यावेळीही केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भक्ता 4 टक्क्यांनी वाढवणार आहे. या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांपर्यंत होणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशभरातील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.

केंद्र सरकारने मार्च 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांच्या वाढीची घोषणा केली होती. त्यानंतर या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के झाला. ही वाढ सरकारने 1 जानेवारीपासून लागू केली आहे. आता पुढील महगाई भत्ता 1 जुलैपासून लागू होणार आहे. दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) 4 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के आहे. जर यामध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली तर 1 जुलैपासून लागू होणारा महागाई भत्ता 46 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

येत्या सहामाहीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांपर्यंत वाढला तर त्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याला सध्या मूळ वेतन 18,000 रुपये आहे आणि त्याला सध्या 42 टक्के दराने 7560 रुपये महागाई भत्ता मिळतो. जर त्याचा महागाई भत्ता 46 टक्के झाला तर कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता 8,280 रुपये होईल. अशाप्रकारे, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दरमहा पगारात 720 रुपयांची (वार्षिक 8640 रुपये) वाढ होईल. पण याबाबत सरकारकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टी घरावर गोळीबार प्रकरणात पुणे कनेक्शन उघड, कर्वेनगरमधून चौघांना अटक

Union Budget 2026: कपडे, शूजपासून औषधांपर्यंत, अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? वाचा संपूर्ण यादी

Kidney Failure: वारंवार थकवा जाणवतो? किडनी निकामी होण्याचे असू शकते लक्षण, वेळीच व्हा सावध अन् वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Accident News : बुलढाण्यात अपघाताचा थरार! महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव कारची जोरदार धडक; ८ जण गंभीर, एका महिलेचा मृत्यू

Rohit Shetty: घराबाहेर गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी कुठे होता? हल्लेखोराबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT