Navi Mumbai News: नवी मुंबईतील खारघर (Kharghar) येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला (Maharashtra Bhushan Award ceremony) उपस्थित लावलेल्या श्री सदस्यांना उष्माघात झाला. उष्माघाताने मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढतच चालला आहे. उष्माघातामुळे सोमवारी आणखी दोन श्री सदस्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 13 वर पोहचला आहे. कल्याण आणि विरारमध्ये राहणाऱ्या श्री सदस्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुसस्कारने गौरवण्यात आले. खारघर येते मोठ्या दिमाखात हा कार्यक्रम पार पडला. पण दुपारच्या वेळी भर उन्हात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या अनेक श्री सदस्यांना उष्माघात झाला.
उष्माघात झालेल्या श्री सदस्यांना नवी मुंबईतल्या एनजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 11 जणांचा मृत्यू झाला होता. पण सोमवारी सकाळी उपचारादरम्यान आणखी दोन श्री सदस्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा हा 13 वर पोहचला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये राहणारे विनायक हळदणकर (55 वर्षे) आणि विरार येथे राहणारे गुलाब पाटील (56 वर्षे) या श्री सदस्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. भर उन्हात बसल्यामुळे त्यांना देखील उष्माघात झाला. त्यांना नवी मुंबईच्या पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण सोमवारी उपचारादरम्यान या दोघांचा मृत्यू झाला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेत उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असलेल्या श्री सदस्यांच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाणार अशल्याचे देखील त्यांनी सांगितले. उष्माघात झालेल्या श्री सदस्यांवर सध्या एमजीएम रुग्णालय आणि नवी मुंबईतील पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.