Saamana Editorial on Modi Government: 'राष्ट्रीय संवेदनशील मुद्यांवर पंतप्रधान 'चूप' असतात'; पुलवामावरून दैनिक 'सामना'तून हल्लाबोल

Saamana Editorial News: 'पुलवामाच्या स्फोटक रहस्य भेदनावरदेखील ते चूप आहेत. अनेक राष्ट्रीय संवेदनशील मुद्दयावर पंतप्रधान 'चूप' असतात, अशी टीका दैनिक 'सामना'तून करण्यात आली .
Saamana Editorial on Modi Government
Saamana Editorial on Modi GovernmentSaam tv

Mumbai News: पुलावामा हल्ल्याप्रकरणी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोप्यस्फोट केल्यानंतर देशातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या गौप्यस्फोटामुळे भाजपवर विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र 'सामना'तून माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या गौप्यस्फोटावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'पुलवामाच्या स्फोटक रहस्य भेदनावरदेखील ते चूप आहेत. अनेक राष्ट्रीय संवेदनशील मुद्दयावर पंतप्रधान 'चूप' असतात, अशी टीका दैनिक 'सामना'तून करण्यात आली .

अग्रलेखात काय लिहिलंय?

सामना अग्रलेखात म्हटले आहे की, 'जवानांच्या बलिदानाचा प्रचार करून भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मते मागितली. त्यावेळीही पुलवामा हल्ल्यामागचे सत्य काय? हल्ला कोणी केला? कोणी घडवून आणला? अशा शंका विरोधी पक्षांनी उपस्थित केल्याच होत्या, पण प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना तेव्हाही देशद्रोही ठरवून मोदी व त्यांचे अंध भक्त मोकळे झाले'.

Saamana Editorial on Modi Government
Shiv Sena Crisis: उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आज दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहणार?

'300 किलो 'आरडीएक्स' इतकी कडक सुरक्षा व्यवस्था भेदून पुलवामापर्यंत पोहोचले कसे? 40 जवानांच्या निर्घृण हत्येस जबाबदार कोण? यामागचे सत्य बाहेर आले नाही, पण जम्मू-कश्मीरचे पुलवामावेळचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सत्याचा स्फोट केला व तो स्फोट 300 किलो आरडीएक्सपेक्षा मोठा आहे. पंतप्रधान मोदी यांचे कश्मीरकडे दुर्लक्ष होते. तेथील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींकडे डोळेझाक केल्यामुळेच झाल्याचे सत्यपाल मलिक यांनी सांगितले, अशा शब्दात सामनातून मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला.

पुढे लिहिले की, 'जम्मू- कश्मीरच्या माजी राज्यपालांची विधाने अत्यंत स्फोटक आहेत व सत्य सांगितल्याबद्दल त्यांना 'ईडी' किंवा 'सीबीआय'कडून लगेच निमंत्रण येऊ शकते. जसे अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत घडताना दिसत आहे. 40 जवानांची हत्या झाली. त्याचे फक्त राजकारण झाले. दुसऱ्या एखाद्या देशात अशा हत्यांबद्दल त्या देशाचे संरक्षणमंत्री किंवा गृहमंत्र्यांचे 'कोर्ट मार्शल'च केले असते, पण 40 जवानांच्या हत्येचे खापर ठरल्याप्रमाणे पाकिस्तानवर फोडून हे लोक गप्प बसले'.

'2019 च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकण्यासाठी 40 जवानांना 'हौतात्म्या'च्या नावाखाली पुलवामामध्ये वधस्तंभावर चढविण्यात आले. त्या शहीद जवानांची आक्रोश करणारी मुले, बायका, माता-पिता यांच्या अश्रूंचा वापर प्रचारात करून पुन्हा सत्ता मिळवली. इतक्या निर्घृण पद्धतीचे राजकारण सध्या सुरू आहे, अशा शब्दात ठाकरे गटाने मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

Saamana Editorial on Modi Government
Maharashtra Bhushan Award ceremony : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात ११ श्री सदस्यांचा मृत्यू, ही घटना वेदनादायी: एकनाथ शिंदे

'मलिक हे विरोधी पक्षांचे पोपट आहेत असे बोलून वेळ मारता येणार नाही. गौतम अदानींच्या कारनाम्यांवर पंतप्रधान चूप आहेत. पुलवामाच्या स्फोटक रहस्य भेदनावरदेखील ते चूप आहेत. अनेक राष्ट्रीय संवेदनशील मुद्दय़ांवर पंतप्रधान 'चूप' असतात. मौनात जाणे पसंत करतात. पंतप्रधानांचे मौन पुलवामा हल्ला व घोटाळय़ाचे समर्थन करते, अशी टीका देखील 'सामना' दैनिकातून करण्यात आली .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com