75th Independence Day 2021! PM मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण Saam Tv
देश विदेश

75th Independence Day 2021! PM मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

75th Independence Day 2021 LIVE updates

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

75th Independence Day 2021 LIVE updates : देशाच्या ७५ स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवले आहेत. इथूनच ते देशाला संबोधित करत आहेत. या कार्यक्रमासाठी जवळपास मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या आमृतमोहत्सवाच्या सर्व क्षणाचे लाईव्ह अपडेट पाहा एका क्षणात....

७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला उपस्थित ऑलिम्पिक खेळाडूंचे मोदी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी देशवासियांना टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करण्याचे आवाहन केले आहे.

फाळणीच्या भीषण शोकांतिकेची आठवण म्हणून हा दिवस पाळला जाणार आहे. द्वेष आणि हिंसेमुळे आजच्या दिवशी आमच्या लाखो बंधू भगिनी आणि मातांना जबरदस्तीने विस्थापित व्हावे लागले होते. अनेकांना यामध्ये प्राणही गमवावे लागले आहे .त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून, हा दिवस पाळण्यात येणार आहे - मोदी

हे देखील पहा-

-यंदापासून प्रत्येकवर्षी १४ ऑगस्टला हा दिवस फाळणी वेदना स्मृतिदिन म्हणून पाळला जाणार आहे- मोदी

-७५ व्या स्वातंत्र्य दिनाला, तुम्हा सर्वांना शुभेच्छा- मोदी

-स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस आणि सुरक्षारक्षकांकडून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

-आजादी का आमृत मोहत्सव २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्यावर ध्वजारोहण करण्यात आले आहे. त्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले आहे. लडाखमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी तिरंगा फडकावत स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे.

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली आणि ते आता देशाला संबोधित करत आहेत.

-नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून सलग ८ स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यावर सकाळी मोदींच्या भाषणाला सुरुवात झालेली आहे.

-सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला श्रद्धांजली वाहिली आहे.

-भारतीय स्वातंत्र्याचा आज अमृतमहोत्सवी दिवस. लाल किल्ल्यावर या कार्यक्रमावर भारतीय वायुदलाच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.

-गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी लाल किल्ल्यावर उपस्थिती राहिली आहे.

-BJP अध्यक्ष जे.पी नड्डा लाल हे देखील किल्ल्यावर पोहचले आहे.

-कोट्यवधी देशभक्तांच्या त्याग, बलिदान, समर्पणातून मिळालेले स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहूया! असे ट्विट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

-स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आज विविध पदकांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रामधील ७४ जणांचा या पदकांनी सन्मान केला जाणार आहे. यामध्ये २५ जणांना पोलिस शौर्यपदके, ३ जणांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ३९ पोलिस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्यात येणार आहेत.

दरवर्षी स्वातंत्र्यदिनी जाहीर होणाऱ्या शौर्य पदकांवर यंदा जम्मू- काश्मीर पोलिसांची छाप उमटली आहे. महत्त्वाचा लष्करी सन्मान मानली जाणारी अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि आणि शौर्य चक्रे देखील याच विभागाला मिळालेली आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबू राम यांना अशोक चक्र (मरणोत्तर), कॉन्स्टेबल अल्ताप हुसैन भट कीर्ती चक्र (मरणोत्तर) आणि विशेष पोलिस अधिकारी शहाबाझ अहमद यांनाही शौर्यचक्र (मरणोत्तर) जाहीर झाले आहे. हे तिन्ही सन्मान एकाच वेळी मिळविण्याची जम्मू- काश्‍मीर पोलिसांची अशी पहिलीच वेळ आहे.

७५ स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मुंबई, दिल्लीसह सर्वच शहरात सुरक्षा यंत्रणांकडून ठिकठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनाला भारताचे पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. यासाठी लाल किल्ल्याच्या मेन गेटजवळ शिपिंग कंटेनरची भिंत उभारण्यात आली आहे. ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या मोदींनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिले आहेत. हा आमृतमोहत्सव देशाला नवी चेतना आणि उर्जा देणारा ठरो, या पद्धतीची आशा मोदींनी यावेळी व्यक्त केली आहे.

Edited By- digambar jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Maharashtra News Live Updates: महायुतीची आज कोल्हापूरमध्ये मोठी प्रचार सभा

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

Sangli Politics: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बंडखोरीचा पॅटर्न; सांगलीत काँग्रेस खासदाराची अपक्ष उमेदवाराला साथ

SCROLL FOR NEXT