15 ऑगस्टला पहिले पंतप्रधान नेहरूंचे भाषण !

या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी इंडिया गेटजवळ प्रिन्सेस पार्कमध्ये राष्ट्रध्वज फडकवलेला होता.
15 ऑगस्टला पहिले पंतप्रधान नेहरूंचे भाषण !
15 ऑगस्टला पहिले पंतप्रधान नेहरूंचे भाषण !Saam Tv
Published On

India Independence Day Speech: या दिवशी भारताचे India पहिले पंतप्रधान Prime Minister जवाहरलाल नेहरू Jawaharlal Nehru यांनी इंडिया गेटजवळ प्रिन्सेस पार्कमध्ये राष्ट्रध्वज फडकवलेला होता. लुईस माउंटबॅटन हे त्यांच्या सोबत त्यावेळेस उभे होते. यावेळी नेहरुंनी ऐतिहासिक भाषण Speech दिले होते. नेहरू म्हणाले होते की, कित्येक वर्षांअगोदर आम्ही नियती बदलण्याचा प्रयत्न केला होता आणि आता ती वेळ आली आहे. जेव्हा आपण आपल्या प्रतिज्ञेपासून मुक्त होणार आहे. पूर्णपणे नाही पण ते महत्वाचे राहणार आहे.

आज रात्री १२ वाजता जेव्हा संपूर्ण जग झोपले आहे, त्यावेळेस भारत स्वतंत्र जीवनाची नवी सुरुवात करणार आहे. नेहरूंच्या या भाषणाने भारतामधील लोकांसाठी नवीन, मुक्त सकाळची आशा निर्माण केलेली होती. देश भौगोलिक आणि आंतरिकरित्या सांप्रदायिक धर्तीवर विभागलेला असून देखील धैर्याला प्रेरत केले होते. नेहरू आपल्या भाषणात म्हणाले होते की, हा एक असा काळ आहे. जो इतिहासात क्वचितच बघायला मिळणार आहे. जुन्यापासून नवीनकडे जाणे, एक युग संपुष्टात येणार आहे.

हे देखील पहा-

आता वर्षानुवर्षे शोषित असलेला देशाचा आत्मा व्यक्त होणार आहे. ते म्हणाले की हा एक प्रकारचा देशासाठी योगा- योग आहे. आम्ही संपूर्ण समर्पणाने भारत आणि या ठिकाणी असलेल्या लोकांची सेवा करण्याची प्रतिज्ञा घेत आहोत. इतिहासाच्या सुरूवाती सोबतच भारताने आपला शोध सुरू केला आहे. माहित नाही की किती शतके भव्य यश आणि अपयशांनी भरली आहेत.

जवाहरलाल नेहरू आपल्या भाषणादरम्यान म्हणाले होते की भविष्यामध्ये आपल्याला विश्रांती घ्यायची नाही. सतत प्रयत्न करत राहायचं आहे. याद्वारे आपण जे बोलतो किंवा म्हणतो ते पूर्ण करू शकणार आहे. भारताची सेवा करणे म्हणजे करोडो पीडितांची सेवा करणे होय. याचा अर्थ अज्ञान आणि दारिद्र्य दूर करणे, रोगांचे उच्चाटन करणे आणि संधीची असमानता नष्ट करणे ही आमच्या पिढी मधील महान माणसाची इच्छा राहणार आहे.

ते म्हणाले, कदाचित हे आमच्याकरिता ते पूर्णपणे शक्य राहणार नाही, पण जोपर्यंत लोकांच्या डोळ्यात अश्रू आहे, आणि ते दु:ख सहन करत आहेत. आमचे काम तो पर्यंत संपणार नाही आणि म्हणून आम्हाला मेहनत करावी लागणार आहे. जेणेकरून आम्ही आमची स्वप्ने साकार करू शकणार आहे. ही स्वप्ने भारत देशासाठी तसेच संपूर्ण जगासाठी राहणार आहे. आज कोणी स्वत:ला पूर्णपणे वेगळा मानू शकणार नाही. कारण सर्व राष्ट्रे आणि लोक एकमेकाबरोबर खूप जवळून संबंधित आहेत. ज्याप्रमाणे शांतता विभागली जाऊ शकणार नाही.

15 ऑगस्टला पहिले पंतप्रधान नेहरूंचे भाषण !
स्वातंत्र्य दिनी भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंना पंतप्रधान मोदींचे आमंत्रण

त्याचप्रमाणे स्वातंत्र्य देखील विभागले जाऊ शकणार नाही. हे जग लहान भागात विभागले जाणार नाही. आपल्याला अशा मुक्त भारत देशाची निर्मिती करायची आहे. जिथे त्याची सर्व मुले राहू शकणार आहेत. नेहरू म्हणाले होते की आज ती योग्य वेळ आहे. नशिबाने ठरवलेला दिवस आणि खूप वर्षांच्या संघर्षानंतर पुन्हा एकदा भारत जागृत आणि मुक्त उभा राहिला आहे. आमचा भूतकाळ आमच्याशी जोडलेला आहे. आम्ही अनेक वेळा घेतलेले वचन पाळण्या अगोदर खूप काही करायचे आहे. पण तरीही टर्निंग पॉइंट भूतकाळातला आहे.

आमच्यासाठी एक नवीन इतिहास सुरू झालेला आहे. एक इतिहास जो आपण बनवू आणि ज्याबद्दल इतर लिहिले पाहिजेत. पंडित नेहरू म्हणाले होते की, आमच्याकरिता हा भाग्यवान काळ ठरणार आहे. एक नवीन तारा जन्माला आलेला आहे. पूर्वेमधील स्वातंत्र्याचा हा तारा. एक नवीन आशा जन्माला आणले आहे. एक दृष्टी अस्तित्वात आलेली आहे. या स्वातंत्र्यामध्ये आपण नेहमी आनंदी रहावे. भविष्य आपल्याला हाक मारणार आहे. पंडित नेहरूंनी १६ ऑगस्ट १९४७ ला १७ व्या शतकात स्मारकाचे मुख्यद्वार असलेल्या लाहोर गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकवला आहे. याला लाहोर गेट असे म्हटले गेले आहे. कारण त्या गेट समोरचा रस्ता त्यावेळी लाहोरच्या दिशेने जात होता. आता प्रत्येक स्वातंत्र्यदिनी आपण अभिमानाने बघतो की आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात आणि नंतर त्याच्या तटबंदीवरून भाषण देत असतात.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com