स्वातंत्र्य दिनी भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंना पंतप्रधान मोदींचे आमंत्रण

तप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक (Tokyo Olympics) चमूला विशेष अतिथी म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित करणार आहेत.
स्वातंत्र्य दिनी भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंना पंतप्रधान मोदींचे आमंत्रण
स्वातंत्र्य दिनी भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंना पंतप्रधान मोदींचे आमंत्रण Saam tv
Published On

नवी दिल्ली: यंदाच्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला (Independent Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक (Tokyo Olympics) चमूला विशेष अतिथी म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी वैयक्तिकरित्या सर्व खेळाडूंना भेटणार असून त्यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर आली आहे.

स्वातंत्र्य दिनी भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंना पंतप्रधान मोदींचे आमंत्रण
IPL 2021: खूशखबर! इंग्लंड खेळाडूंच्या खेळण्याबाबत BCCI ची पुष्टी

टोकियोला गेलेल्या भारतीय खेळाडूंपैकी आतापर्यंत 2 पदकं मिळाली आहेत. त्यापैकी एक पदक मिराबाई चानूला आणि एक पदक पी.व्ही सिंधूला मिळाले आहे. अनेक खेळाडू अगदी पदकाच्या जवळ जाऊन हारले आहेत. अनेक खेळाडूंची ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची स्वप्ने तुडली आहेत. अजून ऑलिम्पिकमध्ये अनेक क्रिडा प्रकार होणे बाकी आहे. भारत अजूनही सुवर्ण पदकाच्या प्रतिक्षेत आहे.

दरम्यान काल भारताची पदकाची प्रबळ दावेदार असलेली डिस्कस थ्रोवर कमलप्रित कौरला पराभव स्वीकारावा लागला होता. आज सकाळी भारतीय हॅकी संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता त्यांच्याकडून कांस्य पदकाची अपेक्षा आहे. भारतीय महीला हॅकी संघही उपांत्यपुर्व फेरीत गेला आहे. यंदाच्या ऑलिम्पिकवरती कोरोनाचे सावट होते. या कोरोनाच्या सावटाखाली खेळाडू खेळताना दिसत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com