Seven Babies Killed By Nurse Saam Tv
देश विदेश

Seven Babies Killed By Nurse: नर्सच्या कृत्याने जग हादरलं, सात चिमुकल्यांची केली निर्घृण हत्या, तिने असं का केलं?

Nurse Arrested By England Police : भारतीय वंशाचे डॉक्टर रवी जयराम यांच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार उघड झाला आहे.

Priya More

England News: इंग्लंडमधून (England) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नर्सने ७ निष्पाप बाळाची निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या नर्सला अटक करण्यात आली आहे. इंग्लंडच्या काऊंटेस ऑफ चेस्टर या हॉस्पिटलमध्ये ही नर्स काम करत होती. भारतीय वंशाचे डॉक्टर रवी जयराम यांच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार उघड झाला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, लुसी लेटबी (३३ वर्षे) असं सात बाळांची हत्या करणाऱ्या नर्सचे नाव आहे. लुसीने अतिशय निर्दयीपणे या बाळाची हत्या केली. हे प्रकरण २०१५ मधील आहे. तिला याप्रकरणी शुक्रवारी दोषी ठरवण्यात आले असून तिला अटक करण्यात आली आहे. २१ ऑगस्ट रोजी म्हणजे उद्या तिला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

याप्रकरणी मँचेस्टरच्या क्राउन कोर्टात वकिलांनी सांगितले की, लुसी लेटबीने २०१५ ते २०१६ या कालावधील १३ नवजात अर्भकांवर गुप्तपणे हल्ला केला होता. कधी नवजात अर्भकांच्या पोटात हवा भरुन, कधी त्यांना प्रमाणापेक्षा जास्त दूध पाजून, कधी मारहाण करुन तर कधी त्यांना इन्सुलिनमधून विष देऊन तिने त्यांचा जीव घेतला. ती या अर्भकांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असल्याचे दाखवून देत होती.

आरोपी लुसीच्या घरी तपास केला असता पोलिसांना विविध प्रकारच्या नोट्स लिहिलेल्या आढळल्या. लुसीच्या घरी आढळलेल्या बहुतांश नोट्समध्ये 'मी सैतान आहे. मला जगायचा अधिकार नाही. मला त्यांची काळजी घेता येत नाही. म्हणून मी त्यांना मारले.' असं लिहिल्याचे दिसून आलं.

हे प्रकरण उजेडामध्ये आणणाऱ्या डॉ. रवी जयराम यांनी सांगितले की, तीन बाळांचा मृत्यू झाला तेव्हाच आमची काळजी वाढली होती. त्यावेळी आम्ही सर्वांनी लुसी लेटबीबाबत संशय व्यक्त केला होता. २०१७ मध्ये आम्ही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्वा माहिती सांगितली तेव्हा पोलिसांना या प्रकरणात लुसीचा हात असू शकते असे वाटले होते. तेव्हापासून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT