CJI Dhananjaya y. chandrachud  Saam Digital
देश विदेश

Lawyers letters To CJI : 'न्यायालयीन क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढतोय'; हरीश साळवे यांच्यासह ६०० वकिलांचं सरन्यायाधीशांना पत्र

Lawyers letters To CJI News : देशात लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत. देशात निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना ज्येष्ठ वकील हरिश साळवे, पिंकी आनंद यांच्यासहित ६०० जणांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाई चंद्रचूड यांना पत्र लिहिलं आहे.

Pramod Subhash Jagtap

lawyers wrote CJI:

देशात लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत. देशात निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना ज्येष्ठ वकील हरिश साळवे, पिंकी आनंद यांच्यासहित ६०० जणांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाई चंद्रचूड यांना पत्र लिहिलं आहे. न्यायालयीन क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढत आहे, अशा आशयाचं पत्र या सर्व वकिलांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहिलं आहे. आहे. (Latest Marathi News)

वकिलांनी पत्रात म्हटलं आहे की, 'न्यायालयीन क्षेत्रातील कामकाजावर विशेष गटाकडून प्रभाव पाडला जात आहे. या गटात भ्रष्टाचारांशी संबंधित प्रकरणात अडकलेल्या नेत्यांचा सामावेश आहे. या गटामुळे लोकशाही आणि न्यायलयीन क्षेत्राला धोका आहे'.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पत्र लिहिणाऱ्या वकिलांमध्ये ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांच्या व्यतिरिक्त मनन कुमार मिश्रा, मनन कुमार मिश्रा, आदिश अग्रवाल, चेतन मित्तल, पिंकी आनंद, हितेश जैन, उज्ज्वला पवार, उदय होल्ला, स्वरूपमा चतुर्वेदी यांच्या नावाचा सामावेश आहे.

वकिलांच्या पत्रात काय लिहिलंय?

वकिलांचं म्हणणं आहे की, 'न्यायालयीन क्षेत्रावर एका विशेष गटाचा राजकीय हस्तक्षेप वाढत आहे. सध्या न्यायालयीन कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे. न्यायालयाच्या कामकाजाविषयी जनतेच्या मनातील विश्वासार्हता कमी करणे याबाबी या गटाकडून सुरु आहेत'.

'राजकीय अंजेड्याच्या माध्यमातून कोर्टाच्या निर्णयावर टीका केली जाते. हा गट 'माय वे किंवा हाय वे' या सारख्या सिद्धातांवर विश्वास करतो. तसेच बेंच फिक्सिंग या सिद्धातांवरही विश्वास ठेवतो, असेही पत्रात म्हटलं आहे.

वकिलांचा आरोप आहे की, 'काही नेते काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. हे प्रकरण कोर्टात असेल तर आरोप करणाऱ्या नेत्याच्या मनासारखा निकाल लागला नाही, तर ते कोर्टावर माध्यमांचा आधार घेऊन टीका करतात'.

'काही प्रकरणात न्यायाधीशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. नेत्यांकडून सोशल मीडियावर खोटे पसरवले जात आहे. राजकीय सत्तेच्या माध्यमातून कोर्टाच्या निर्णयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. या बाबीला कोणत्याही स्थितीत स्वीकारता येणार नाही, असंही पत्रात म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Health : सावधान! थंडीत रात्री झोपताना तोंडापर्यंत ब्लँकेट घेताय? 'ही' चूक पडेल महागात

Maharashtra Politics: निवडणुकीचे बिगुल वाजताच अजित पवारांचा भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्यासह १५ जण राष्ट्रवादीच्या वाटेवर

Kitchen Hacks : बटाटे कापल्यावर लगेच काळपट पडतात? मग फॉलो करा या टिप्स

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Jasmine Oil Benefits For Skin And Hair: थंडीत चेहरा अन् केसांना लावा चमेली तेल, ४-५ दिवसात दिसेल मोठा फरक

SCROLL FOR NEXT