Ramtek Lok Sabha: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द

Congress Rashmi Barve News: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे.
Rashmi Barve caste verification certificate
Rashmi Barve caste verification certificateSaam TV
Published On

Rashmi Barve Caste verification certificate

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांनी बुधवारी (ता २७) रामटेकमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने काँग्रेससमोर मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rashmi Barve caste verification certificate
Maharashtra Election 2024: शिंदे गटात बंडखोरीचे संकेत; छगन भुजबळांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध, नाशिकमध्ये काय घडतंय?

रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र बनावट आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता. यावर हायकोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. मंगळवारी (ता. २६) कोर्टाने यावर सुनावणी घेत रश्मी बर्वे यांना दिलासा देखील दिला होता. मात्र, आज जातपडताळणी समितीने त्यांचं प्रमाणपत्र रद्द केलं आहे. (Latest Marathi News)

ऐन निवडणुकीच्या हंगामात हा निर्णय समोर आल्याने आता बर्वे यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडीची मोठी अडचण झाली आहे. जात वैधता प्रमाणपत्रावर घेतलेल्या आक्षेपवर बर्वे यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा निश्चय केला होता. मात्र आता जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयानंतर पुढे काय करावे? असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. (Lok Sabha Election 2024)

नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्मी बर्वे या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत. बर्वे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला होता. मात्र, ही उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचाही मुद्दा समोर आला.

त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यात आलेली नाही, असा दावा विरोधकांनी केला होता. बर्वे यांच्याविरोधात सुनिल साळवे नावाच्या व्यक्तीने तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीनंतर सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणी समितीला योग्य ती कारवाई करण्याचा आदेश दिला होता.

Rashmi Barve caste verification certificate
Navneet Rana News: नवनीत राणा यांच्या भाजपा प्रवेशानंतर आमदार बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया; महायुतीला दिला थेट इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com