Maharashtra Election 2024: शिंदे गटात बंडखोरीचे संकेत; छगन भुजबळांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध, नाशिकमध्ये काय घडतंय?

Nashik Election 2024 News in Marathi: छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास बंड करू, असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीची बैठक बोलावली आहे.
Nashik Shiv Sena vs Chhagan Bhujbal
Nashik Shiv Sena vs Chhagan BhujbalSaam TV
Published On

Nashik Shiv Sena vs Chhagan Bhujbal

मागील काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरुन भाजप आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातच या जागेवर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे निवडणूक लढवणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरून शिंदे गटातील पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास बंड करू, असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nashik Shiv Sena vs Chhagan Bhujbal
Navneet Rana News: नवनीत राणा यांच्या भाजपा प्रवेशानंतर आमदार बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया; महायुतीला दिला थेट इशारा

शिवसेना पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. काही वेळातच मुंबईत या बैठकीला सुरुवात होणार आहे. पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि नाशिक शिवसेना शहराध्यक्ष प्रवीण तिदमे यांची बैठकीला उपस्थिती असणार आहे. (Latest Marathi News)

नाशिक लोकसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार हेमंत गोडसे हेच निवडणूक लढवणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर भाजप आणि शिंदे गटात चांगलंच वाकयुद्ध सुरु झालं होतं.

महायुतीतील जागावाटपावर वरिष्ठ चर्चा करत असताना श्रीकांत शिंदे यांनी कोणाला विचारून नाशिक लोकसभेची उमेदवारी जाहीर केली? असा संतप्त सवाल भाजप पदाधिकाऱ्यांनी विचारला होता. इतकंच नाही, तर भाजपने यंदा नाशिकच्या जागेवर उमेदवार द्यावा, अशी मागणी देखील भाजप पदाधिकारी करीत होते.  (Lok Sabha Election 2024)

Nashik Shiv Sena vs Chhagan Bhujbal
lok Sabha : उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेना नेत्यांना होतोय पश्चाताप? भाजपच्या भूमिकेमुळे शिंदे गटात अस्वस्थतेची चर्चा

दरम्यान, नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात वाद रस्सीखेच सुरु असताना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे भाजपच्या तिकीटावर नाशिक लोकसभेची निवडणूक लढवणार, अशी चर्चा सुरु झाली. या चर्चेनंतर शिंदे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरल्याचं कळतंय.

नाशिक लोकसभेतून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास आम्ही मोठं बंड करू, असा इशाराच शिवसैनिकांनी केला आहे. भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी बेताल विधाने केल्यामुळे नाशिकमधील मराठा बांधव आक्रमक आहेत. ते भुजबळ यांच्याविरोधात प्रचार करू शकतात. यामुळे महायुतीला मोठा फटका बसू शकतो, असं शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com