5G Network Fraud Saam TV
देश विदेश

5G Network Fraud: 5G सेवा सुरु करायला जाल, बँक खातं होईल रिकामं; 'ही' चूक अजिबात करु नका, पाहा Video

5G Network Fraud News: G च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करण्यात आल्याचे काही प्रकार छत्तीसगड राज्यातून समोर आले आहेत.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑक्टोबरला देशातील १३ शहरांमध्ये 5G नेटवर्क (5G Network) सेवा सुरू करण्यात आली. जलद गतीचं इंटरनेट आणि वेगवान कामांसाठी ही सेवा सर्वांसाठीच उपयोगी ठरणार आहे. 5G सेवा देणाऱ्या कंपन्यांनाही या सेवेच्या जाहीराती करत आहेत. यायाच फायदा आता काही चोरटे घेत आहेत. 5G च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक (Fraud) करण्यात आल्याचे काही प्रकार छत्तीसगड राज्यातून समोर आले आहेत. (Chhattisgarh 5G Network Fraud News)

5G सेवा अजूनही देशात सर्वत्र सुरू झालेली नाही, मात्र या सेवेच्या नावाखाली फसवणूक सुरू झाली आहे. छत्तीसगडमधील काही नागरिकांना 5G सेवा सुरू करुन देतो म्हणून फोन आले. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तिने मोबाईलवरील ओटीपी विचारला. हा ओटीपी समोरच्या व्यक्तीला सांगताच त्यांच्या खात्यातील पैसे काढून घेण्यात आले. त्यामुळे भविष्यात तुम्हाला फोनवरुन ओटीपी विचारल्यास चुकूनही तो सांगू नका किंवा शेयर करुन नका. कारण, टेलिकॉम कंपनी असो किंंवा बॅंक असो कुणीही ओटीपी मागत नाही. त्यामुळे कुणालाही ओटीपी शेयर करु नका.

अशी आहे मोडस ऑपरेंडी

- टेलिकॉम कंपनीतून बोलतोय असो खोटा कॉल येतो

- 5G सेवा सुरू करु देतो असं सांगितलं जातं

- त्यासाठी मोबाईवर येणारा OTP मागितला जातो

- एकदा का OTP शेयर केला की, आपल्या खात्यातून पैसे काढले जातात

दरम्यान देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू झाली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, कोलकाता, जामनगर, लखनऊ, पुणे या शहरांचा समावेश आहे. दोन वर्षांनंतर 5G सेवेचा देशभरात झपाट्याने विस्तार केला जाईल.

या सेवेने देश सुपरफास्ट होणार असून लोकांना जलदगतीने इंटरनेट उपलब्ध होईल. भारतावर 5G चा एकूण आर्थिक प्रभाव 2035 पर्यंत 450 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत असण्याचा अंदाज आहे. 4G च्या तुलनेत, 5G नेटवर्क अनेक पटींनी जलद गती देते. (Maharashtra News)

5G सेवेसाठी किती पैसे मोजावे लागणार?

5G सेवेच्या रिचार्जसाठी किती पैसे मोजावे लागणार? याबाबतची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. मात्र, तज्ञांच्या माहितीनुसार, सुरुवातीला 5G साठी 4G इतकीच किंमत मोजवा लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र टेलिकॉम कंपन्या 5Gच्या किंमतीत वाढ करतील, असा अंदाज बांधला जातोय.

5G सेवा आज जरी लॉन्च केली जाणार असली, तरी प्रत्यक्षात ग्राहकांना मात्र या सेवेसाठी ग्राहकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. एअरटेल आणि जिओ यांच्याकडून 5G सेवेला सुरूवात केली जाण्याची शक्यता आहे.

Edited By - Akshay Baisane

पाहा व्हिडिओ -

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT