Dombivli Crime: 365 दिवसांचं प्लानिंग, 34 कोटींवर डल्ला; Money Heist वेब सिरीज पाहून चोर बनलेल्या बॅंकेच्या कॅश मॅनेजरला अटक

Dombivli ICICI Bank Robbery News : वेब सिरीज पाहून त्याला बँकेच्या तिजोरीतून रोकड कशी लंपास करायची याची कल्पना आली.
Dombivli ICICI Bank Robbery News
Dombivli ICICI Bank Robbery Newsप्रदीप भणगे
Published On

डोंबिवली: जगात लोकप्रिय ठरलेली मनी हाईस्ट (Money Heist) ही क्राईम थ्रिलर वेब सिरीज पाहून एका बॅंकच्या कॅश मॅनेजरने आपल्याच बॅंकेच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे. डोंबिवलीमधील (Dombivali) एमआयडीसी भागात असलेल्या आयसीआयसीआय या बॅंकेच्या तिजोरीतून ३४ कोटी रुपये लांबवल्याचाप्रकार काही महिन्यापूर्वी समोर आला होता. आता या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. (Dombivali Crime News)

Dombivli ICICI Bank Robbery News
Crime : संतापजनक! दारू पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हेगाराला अटक

डोंबिवलील एमआयडीसीच्या निवासी भागात आयसीआयसीआय बॅक आहे. या बँकेत आरोपी अल्ताफ शेख हा कॅश कस्टोडियन मॅनेजर म्हणून कार्यरत होता. त्याने झटपट श्रीमंत होण्यासाठी बँकेतील तिजोरीवर डल्ला (Robbery) मारण्याचा कट वर्षभरापूर्वी रचला होता. या बँकेवर दरोडा टाकण्यासाठी तो मनी हाईस्ट वेब सिरीज पाहत होता. अजून काही वेब सिरीज पाहून त्याला बँकेच्या तिजोरीतून रोकड कशी लंपास करायची याची कल्पना आली. त्यातच तो कॅश कस्टोडियन मॅनेजर असल्याने त्याला बँकेविषयी सर्वच माहिती होती. (Maharashtra News)

एक दिवशी त्याने बँकेतील तिजोरी रूमच्या बाजूला असलेल्या एसी दुरुस्तीचे काम करताना पहिले आणि त्याने एक योजना बनवली. त्याने आधी सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींचा अभ्यास केला आणि नंतर चोरीसाठी लागणारे साहित्य गोळा केले. ९ जुलैला सुट्टीच्या दिवशी बँकेचे अलार्म निष्क्रिय करत सर्व कॅमेऱ्यांच्या हार्ड डिस्क काढून त्याने तिजोरीतून ३४ कोटी रुपये लंपास केले. हे पैसे त्याने एसीच्या डक्टमधील छिद्रातून बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूस बांधलेल्या ताडपत्रीवर फेकून दिले.

Dombivli ICICI Bank Robbery News
Delhi Weather Update: दिल्ली-एनसीआरला पुन्हा पावसाने झोडपलं; नागरिकांचे प्रचंड हाल

यानंतर बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर गहाळ असल्याची माहिती बँकेच्या वरिष्ठांना देऊन तिजोरीतील रक्कम तपासणी करण्याचे पथक बँकेत बोलावले. एकीकडे तपासणी सुरू असताना दुसरीकडे त्याने आपल्या कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी नावाच्या तीन मित्रांना बोलवून ३४ कोटींपैकी सुमारे १२ कोटी त्यांच्याकडे सोपवले. यानंतर चोरीचा बनाव करत त्याने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी याप्रकरणी तपास करत विविध बाबी तपासून यामधील तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आणि ५ कोटींच्यावर रक्कम जप्त केली आहे. त्यानंतर तिन्ही आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अडीच महिन्यांच्या तपासानंतर बँकेचा कॅश कस्टोडियन मॅनेजर अल्ताफ शेख याला पुण्यातून ताब्यात घेतले. सध्या पोलिसांनी ९ कोटी रुपये जप्त केले आहेत. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शेखसह त्याची बहीण नीलोफर आणि इतर पाच आरोपींना अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com