Delhi Rain: दिल्ली (Delhi) आणि आसपासच्या भागात पहाटेपासून पावसाळा (Rain Update) सुरुवात झाली आहे. दिल्लीत पुढील काही दिवस असेच राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. ढगांसह थंड हवेमुळे दिल्लीच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. पावसामुळे दिल्ली-एनसीआरच्या विविध भागात पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या अडचणी वाढल्या आहेत. (Delhi Weather Update)
दिल्ली-एनसीआरमध्ये दिवसभर हवामान कसे असेल?
IMD नुसार, 7 ऑक्टोबर रोजी संपूर्ण दिवस दिल्लीत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, किमान तापमान 21 अंश आणि कमाल तापमान 30 अंश आहे. आज सकाळपासून नोएडामध्येही पाऊस पडत आहे. तापमानाबद्दल बोलायचे झाले तर, येथे किमान तापमान 22 अंश तर कमाल तापमान 25 अंश आहे.
गुरुग्राममध्येही पाऊस सुरू आहे, जो दिवसभर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गुरुग्राममध्ये किमान तापमान 21 अंश आणि कमाल तापमान 30 अंश आहे. प्रदूषणाबाबत बोलायचे झाले तर पावसामुळे दिल्लीच्या प्रदूषणात घाट झाली आहे. पुढील काही दिवस पाऊस कायम असल्याने हवेच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. काल राज्यातील काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली. काल मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. तसेच राज्यातील पुणे, नाशिक, सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात देखील पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.