Vrindavan Building Balcony Collapsed Saam Tv
देश विदेश

Vrindavan Building Balcony Collapsed: बांके बिहारी मंदिराजवळ इमारतीची बाल्कनी कोसळली, ५ भाविकांचा मृत्यू; ६ गंभीर जखमी

Banke Bihari Temple: जखमींवर नजीकच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Priya More

Uttar Pradesh News: तिर्थक्षेत्र असलेल्या उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मथुरा जिल्ह्यातील वृंदावन (Vrindavan) येथील बांके बिहारी मंदिराजवळ (Banke Bihari Temple) मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. जुन्या इमारतीची बाल्कनी (Vrindavan Wall Collapsed) कोसळली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विष्णूबागेतील इमारतीची जीर्ण बाल्कनी अचानक कोसळली. रस्त्यावरुन जाणाऱ्या भाविकांच्या अंगावर ही बाल्कनी कोसळली. त्यामुळे या दुर्घटनेमध्ये ५ भाविकांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. माकडांच्या दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात इमारतीची बाल्कनी पडली असल्याचे सांगितले जात आहे.

बांके बिहारी मंदिराजवळ डोसायत परिसरात विष्णू शर्मा यांची जुनी इमारत आहे. या इमारतीची बाल्कनी जीर्ण झाली होती. या बाल्कनीमध्ये माकडांच्या दोन गटामध्ये भांडण सुरु होते. त्यामुळे बाल्कनी कोसळली. ही बाल्कनी रस्त्यावरुन जाणाऱ्या भाविकांच्या अंगावर पडली. बाल्कनीच्या ढिगाऱ्याखाली काही भाविक अडकले गेले. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य केले. पण ५ जणांचा जागीच मृत्यू झाला होता.

मृतांमध्ये गीता कश्यप (रहिवासी कानपूर), अरविंद कुमार (रहिवासी कानपूर नगर), रश्मी गुप्ता (रहिवासी कानपूर), अंजू मुगी (रहिवासी वृंदावन) आणि एका अज्ञाताचा समावेश आहे. त्याचबरोबर जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे.

घटनेची माहिती देताना एसएसपी शैलेश पांडे यांनी सांगितले की, दोसयतजवळ एक जुनी तीन मजली इमारत होती. या इमारतीच्या वरचा भाग अचानक कोसळला. त्यामुळे काही लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या पथकासह अग्निशमन दलाचे पथकही बचावकार्यात गुंतले आहे. एकूण 11 जण ढिगाऱ्याखाली दबले गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

Nayanthara Lovestory: विवाहीत प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती नयनतारा, धर्मही बदलला मात्र नातं फार काळ टिकलं नाही....

SCROLL FOR NEXT