Wayanad Landslide  Saam Tv
देश विदेश

wayanad landslide : देव तारी त्याला कोण मारी! ५ दिवसानंतर १० जण ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर, एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश

Wayanad Landslide News : ५ दिवसानंतर १० जण ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर आले आहेत. यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे.

Vishal Gangurde

वायनाड : केरळच्या वायनाडमध्ये विनाशकारी भूस्खलनात आतापर्यंत ३४४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत अजूनही मोठ्या प्रमाणात लोक बेपत्ता आहेत. या भयंकर दुर्घटनेदरम्यान एक सुखावणारी बातमी हाती आली आहे. भूस्खलन झाल्यानंतर दरडी कोसळून अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. या भीषण दुर्घटनेतूनही १० जण जिवंत आढळले. यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. तसेच या वन विभागाच्या जवानांनी आदिवासी वस्तीतील ४ लहान मुले आणि एक पुरुष आणि महिलेचा जीव वाचवला आहे. असे एकूण १० जण जिवंत आढळले आहेत.

वायनाडमधील चार गावात भूस्खलन झालं. या दुर्घटनेत चूरलमाला, अट्टामाला, नूलपुझा या सुंदर गावांचा विनाश झाला. या घटनेत ३०० हून अधिक जण मृत्यूमुखी झाले आहेत. अद्यापही शेकडो लोक बेपत्ता आहेत. अजूनही पोलीस, अग्निशमन दल, वन विभाग आणि सैन्यातील दलाकडून मदतकार्य आणि शोधकार्य सुरु आहे. या दुर्घटनेनंतर तेथील पीडित व्यक्तींना काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी भेट दिली.

टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, वायनाडमधील मुंडकई गावात ४५०-५०० घरे होती. दुर्घटनेनंतर या गावात ३४ ते ४९ घर शिल्लक राहिली आहेत. ३० जुलै रोजी झालेल्या भूस्खलनानंतर पूर्ण गाव उद्धवस्त झालं. या गावातील अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. या गावात सैन्य दलाचे जवान, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांकडून रेस्कू ऑपरेशन सुरु आहे.

या मदतकार्यादरम्यान एकाच कुटुंबातील ४ जण जिंवत आढळले. जवानांना चिखल आणि ढिगाऱ्याखाली कोणीतरी श्वास घेतल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी या कुटुंबातील ४ जणांचा जीव वाचवला. या घटनेत त्यांचं घर वाचलं असलं तरी त्यांच्या कुटुंबियांची ताटातूट झाली आहे. ४ जण जिवंत आढळल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.

मीडिया रिपोर्टनुसार, वायनाडच्या पनिया समाजाचं एक कुटुंब डोंगराळ भागातील एका गुहेत अडकलं होतं. पथकाला त्यांच्यापर्यंत पोहोचायला साडे चार तास लागले. जवान हशीसने सांगितलं की, एक महिला आणि तिचा चार वर्षांचा मुलगा डोंगराळ भागात आढळला. त्यानंतर आणखी तीन मुले आणि त्यांचे वडीलही गुह्यात अडकले होते. अशा एकूण ६ जणांचा जीव वाचवला'. हशीसने म्हटलं की, 'लहान मुले थकले होते. आम्ही त्यांच्यासाठी जेवण घेऊन गेलो होतो. त्यांना समजावून सुखरुप खाली घेऊन आलो'. अट्टामाला येथे आल्यानंतर या लहान मुलांना कपडे आणि बुटे दिली. आता हे मुले सुरक्षित आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; अल्झायमरशी झुंज देताना घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

Daily horoscope today: महिन्याचा शेवट १२ राशींसाठी कसा होणार? या ५ राशींचं नशीब चमकून धनलाभ होणार, वाचा राशीभविष्य

ड्रग्स-वेश्या व्यवसायाची भीती दाखवली; मुंबईतल्या विवाहित महिलेला बोगस पोलिसांनी गंडवलं

Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा समोर; ७१ लाख महिलांचा ₹१५००चा लाभ कायमचा बंद

SCROLL FOR NEXT