Burning bus after collision with a diesel tanker on the Makkah–Madinah highway, where 42 Indian pilgrims lost their lives. Saam TV Marathi News
देश विदेश

मक्काहून येताना मध्यरात्री काळाचा घाला, ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू, आगीचा भयानक व्हिडिओ

Why did the Saudi Arabia bus catch fire after the tanker collision? सौदी अरेबियात मक्का-मदीना महामार्गावर भीषण अपघात झाला. डिझेल टँकर आणि बसची जोरदार धडक होऊन ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असून फक्त एकच प्रवासी जीव वाचला आहे.

Namdeo Kumbhar

  • मक्काहून मदीनाकडे जाणाऱ्या भारतीय भाविकांच्या बसला डिझेल टँकरने मध्यरात्री धडक दिली.

  • धडकेनंतर बस आणि टँकरला भीषण आग लागून ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू झाला.

  • मृतांमध्ये २० महिला आणि ११ मुलांचा समावेश; फक्त एक प्रवासी जीवंत वाचला.

  • भारतीय दूतावास व तेलंगणा सरकारने हेल्पलाइन नंबर जारी करून कुटुंबांशी संपर्क सुरू केला आहे.

Telangana Umrah pilgrims Saudi Arabia Accident : सौदी अरेबियाला हज यात्रेसाठी गेलेल्या भारतीयांवर काळाने घाला घातला आहे. मक्काहून मदीनाकडे जाताना भारतीय प्रवाशांच्या बसला एका डीझेल टँकरने जोरात धडक दिली. मध्यरात्री दीड वाजता टँकर अन् बसची जोरात धकड झाली. बसमधील सर्वजण झोपेत असतानाच काळाने घाला घातला अन् क्षणात परिसरात हाहाकार उडाला. बसमधील ४२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांच्या किंकाळ्याने परिसर हादरून गेला होता. मृतामधील भाविक हे हैदराबादमधील जास्त असल्याचे समजतेय.

मक्काहून मदीना निघाले, वेळ रात्री दीड वाजता. बसमधील महिला, मुले अन् इतर सर्वजण झोपेत होते. पण त्याचवेळी मुहरासजवळ डिझेल टँकरने जोरात धडक दिली अन् दोन्ही वाहनाने पेट घेतला. पाहता पाहता बसचे रूपांतर आगीच्या गोळ्यात झाले. आतमध्ये असणारे बाहेर येण्यासाठी आरडाओरडा करत होते. परिसर किंकाळ्यांनी हादरून गेला होता. लहान मुले, महिलांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. देवदर्शनासाठी गेले होते, पण काळाने घाला घातला अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले.

पण आग इतकी भयंकर होती की दुर्दैवी घटनेत ४२ भारतीयांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये २० महिला आणि ११ मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेतून फक्त एक प्रवासी वाचलाय. त्याच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बसला आग लागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आग विझवताना अग्निशामन दलाचे कर्मचारी दिसत आहेत. आग इतकी प्रचंड आहे की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन ते चार तास लागल्याचे सांगण्यात येत आहे.

तेलंगाना सरकार रियादमधील भारतीय दूतावासाच्या संप्रकात आहे. भारतीय दूतावासाकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. दूतावासकडून सांगण्यात आले की, "सौदी अरेबियाच्या मदीनाजवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे. जेद्दामध्ये भारतीयांसाठी 24x7 कंट्रोल रूम केले आहे. 8002440003 या क्रमांकावर कधीही संपर्क करू शकता" दरम्यान, तेलंगणा सरकारकडूनही हैदराबाद आणि राज्यातील प्रवाशांच्या कुटुंबासाठी 79979-59754 आणि 99129-19545 क्रमांक जारी केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईतील ५०० कोटींचं पालिकेचं हॉस्पिटल वादात; अंजली दमानिया यांची कठोर भूमिका, नेमकं प्रकरण काय?

BJP : पालघर साधू हत्याकांड : काशिनाथ चौधरींना आधी भाजपात प्रवेश, २४ तासांत स्थगिती

Bhakri Tips: भाकरी भाजण्यासाठी कोणता तवा वापरावा? भाकऱ्या होतील अगदी मऊ आणि लुसलुशीत

Sheikh Hasina: मोठी बातमी! शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, १४०० जणांच्या हत्याप्रकरणात दोषी

कल्याणमध्ये मध्यरात्री तरूणाची दादागिरी; कोयता घेऊन धिंगाणा, गाड्या अडवून...

SCROLL FOR NEXT