Punjab Military Station Firing Saam Tv
देश विदेश

Punjab Military Station Firing: पंजाबच्या मिलिट्री स्टेशनजवळ गोळीबार, 4 जवानांचा मृत्यू

Latest Breaking News: बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकले नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Punjab News: पंजाबमधून (Punjab) मोठी बातमी समोर येत आहे. पंजाबच्या मिलिट्री स्टेशनजवळ गोळीबार (Firing At Military Station) झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा तपास जवानांकडून सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बठिंडा मिलिट्री स्टेशनमधील (Bathinda Military Station) ऑफिसर्स मेसमध्ये ही घटना घडली. बुधवारी पहाटे ४.३५ च्या सुमारास अचानक गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये चार जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर स्टेशन क्विक रिअॅक्शन टीम्स सक्रिय करण्यात आल्या आहे. परिसरात नाकाबंदी करून सील करण्यात आले आहे. जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. मिलिट्री स्टेशनबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

बठिंडा मिलिट्री स्टेशनच्या एसएसपी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, 'हा दहशतवादी हल्ला नाही. मिलिट्री स्टेशनच्या आतमध्ये काहीतरी प्रकरण घडले. आमची टीम तपास करत आहे. सध्या लष्कराने आम्हाला आत जाण्याची परवानगी दिलेली नाही.'

पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आर्मी कॅंट भटिंडा जिओ मेसमध्ये गोळीबार झाला आहे. आर्मी कॅन्टचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत. 2 दिवसांपूर्वी यूनिट गार्डच्या रुममधून एक इनसास असॉल्ट रायफलसह 28 काडतुसे गायब झाली होती. त्यामुळे या गोळीबारामागे या रायफलचा वापर केला गेला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या लष्कराने स्थानिक पोलिसांना कॅन्टोन्मेंट परिसरात जाऊ दिलेले नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT