Himachal Pradesh Weather News Saam Tv
देश विदेश

Himachal Weather: हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस, बर्फवृष्टीमुळे 350 रस्ते बंद; शाळा-महाविद्यालयांना सुटी

Himachal Pradesh Weather: मार्च महिन्याच्या सुरुवातीला हिमाचल प्रदेशातील उंच भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. तसेच मैदानी भागात मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात थंडीची लाट पसरली आहे.

Satish Kengar

Himachal Pradesh Weather News:

मार्च महिन्याच्या सुरुवातीला हिमाचल प्रदेशातील उंच भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. तसेच मैदानी भागात मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात थंडीची लाट पसरली आहे. राज्याची राजधानी शिमलामध्ये सकाळपासून पाऊस पडत आहे.

राज्यातील पाच डोंगरी जिल्ह्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही बर्फवृष्टी सुरू आहे. शिमलासह राज्याच्या मैदानी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. खराब हवामानामुळे लाहौल खोऱ्यात हिमस्खलन होण्याचा धोका वाढला आहे. हिमवृष्टीमुळे आदिवासी जिल्ह्यांतील वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा आणि दळणवळण व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. चार राष्ट्रीय महामार्गांसह 350 रस्त्यांवर वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे. बर्फवृष्टी आणि पावसामुळे 1314 ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बर्फवृष्टीमुळे लाहौल स्पिती, कुल्लू आणि मनाली उपविभागातील सर्व शैक्षणिक संस्था आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. याबाबत संबंधित एसडीएम यांनी आदेश जारी केले आहेत. हिमाचल प्रदेश बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसारच घेतल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या अहवालानुसार, किन्नौर, लाहौल स्पीती, कुल्लू, चंबा आणि शिमला जिल्ह्यात बर्फ पडत आहे. लाहौल-स्पिती जिल्ह्यातील केलॉन्गमध्ये दीड फूट, उदयपूरमध्ये दोन फुटांपेक्षा जास्त, त्रिलोकनाथमध्ये अडीच फूट बर्फवृष्टी झाली आहे. तर उंचावर असलेल्या भागात चार फुटांपर्यंत बर्फवृष्टी झाली आहे. किन्नौर जिल्ह्यातील चितकुल आणि असरंगमध्ये दोन फूट, कल्पा आणि सांगलामध्ये दीड फूट बर्फवृष्टी झाली आहे.

चंबा जिल्ह्यातही पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू असून त्यामुळे अनेक रस्ते ठप्प झाले आहेत. पांगी खोऱ्यात एक फूट बर्फवृष्टी झाली आहे. कुल्लू जिल्ह्यातही उंच शिखरांवर बर्फवृष्टी सुरू असून खालच्या भागात काल रात्री ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. असं असलं तरी या बर्फवृष्टीने शेतकरी आणि बागायतदार चांगलेच खूश आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

SCROLL FOR NEXT