Husband End Life After Saam Tv
देश विदेश

Shocking: 'मला मरायचं नाही, पण माझी बायको दुसऱ्यासोबत हॉटेलवर...', ७ मिनिटांचा VIDEO पोस्ट करत तरुणाची आत्महत्या

Man end life after accusing wife: उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये ३० वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. बायको आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी त्याने व्हिडीओ काढला होता.

Priya More

उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या तरुणाने ७ मिनिटांचा व्हिडीओ तयार केला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. बायकोने धोका दिल्याने आणि तिने त्याला स्वत:च्या मुलापासून वेगळं केल्यामुळे चिंतेत येऊन या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले. या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. हा तरुण कौटुंबिक वाद आणि आर्थिक दबावामुळे चिंतेत होता. त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल मिश्रा असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते. तो वाराणसीच्या लोहटा भागातील बनकट गावात राहत होता. घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. त्यांनी राहुलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. राहुलच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याची बायको, तिचा बॉयफ्रेंड आणि तिच्या आईविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. राहुलने ५ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता.

तपासादरम्यान पोलिसांना राहुलच्या मोबाइलमध्ये ७ मिनिटं २९ सेकंदाचा व्हिडीओ सापडला. या व्हिडीओमध्ये राहुलने त्याची बायको आणि तिच्या बॉयफ्रेंडने आपली फसवणूक केल्याचे म्हटले आहे. राहुलने त्याच्या बायकोला शुभमपासून दूर राहण्यास सांगितले तरी देखील ती त्याच्या संपर्कात होती याचा त्याला प्रचंड त्रास होत होता. तसंच तिने राहुलला त्याच्या मुलापासून दूर केले होते. तो मुलाला भेटायला गेला तर त्याला भेटून दिले जात नव्हते. तसंच राहुलची सासू देखील त्याला त्रास देत होती असे त्याने व्हिडीओत म्हटले आहे.

आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल सांगतो की, 'मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो. मला जगायचे आहे. पण मी आज आत्महत्या करत आहे. मला नाही आवडत माझी बायको दुसरं कुणाशी बोलते. शुभम सिंग माझ्या बायकोचा वापर करत आहे. माझा छोटा मुलगा आहे मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मी त्याला भेटायला गेलो तर मला भेटून दिले जात नाही. माझ्यावर कर्ज आहे. माझे आई-वडील देखील माझ्या बायकोचा स्वीकार करत नव्हते. माझ्या बायकोने अनेक वेळा माझ्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. तिने मला पोलिसांकडून अनेक वेळा मार खायला लावला. माझी जगण्याची इच्छा आहे. माझी इच्छा होती की माझ्या बायकोने माझ्यावर प्रेम करावे. पण ती मला नेहमी टेन्शनमध्ये ठेवायची. '

राहुलने व्हिडीओत सरकारकडे मागणी केली की, 'भाजप सरकारकडे माझी मागणी आहे की फक्त मुलींचेच शोषण होत नाही तर मुलांचे देखील शोषण होते. २०१४ नंतर मुलांचे देखील शोषण होऊ लागले. कायदा दोघांसाठी समान पाहिजे. माझी बायको म्हणते मी शुभमशी बोलणार कारण तो मला सपोर्ट करतो. पण खरं तर तो तिला सपोर्ट करत नाही तर तिचा वापर करतो. तो तिला ओयोपर्यंत घेऊन जाईल. मला मरण्याची इच्छा अजिबात नाही. माझ्या बायकोला शिक्षा होऊ नये पण तिने कदर करायला शिकावे हिच माझी इच्छा आहे. तिचा बाप वेडा आहे. तिच्या आईने सांगितले की माझा नंबर ब्लॉक कर. भांडण सर्व कुटुंबात होतात याचा अर्थ असा नाही होत की नंबर ब्लॉक करायचा.'

तसंच,'गर्लफ्रेंड कुणाच्या प्रेमात पडली तर मुलगा सुसाईड करतो आणि लग्न झालेल्याची बायको असे करत असेल तर पुरूषाने काय करावे. मी लग्नात एक रुपया पण हुंडा घेतला नाही. मी फ्रीमध्ये तिच्यासोबत लग्न केले. पण कोणता पुरूष त्याच्या बायकोचे दुसऱ्या पुरूषासोबत संबंध असेल तर सहन करू शकतो का? माझा आज शेवटचा दिवस आहे. माझी विनंती आहे की, पुरुषांचे कुठेही ऐकले जात नाही. कलम ४९८ मध्ये सुधारणा करणा करण्यात यावी. माझा छोटा मुलगा आहे मी खूप स्वप्न पाहिले पण माझ्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप- शिंदेसेनेचं पुन्हा फिस्कटणार? 13 महापालिकांवरून महायुतीत रस्सीखेच

Raigad : विद्यार्थिनी अलिबागहून महाडला स्पर्धेत आली, अचानक शाळेच्या मैदानात कोसळून मृत्यू

एका दिवसात डायबेटीस गायब? डायबेटीस मुक्तीची संजीवनी सापडली

Samata Nagari Cooperative Credit Society: राज्यात ३० शाखा, ११०० कोटींच्यावर ठेवी अन् ठेवीदारांचा जीव टांगणीला, समता पतसंस्थेचा नेमका काय आहे प्रकार?

Film Festival: ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लवकरच सुरु; तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT