bihar latest news Saam tv
देश विदेश

२८ वर्षांच्या तरुणीचं ६० वर्षीय मॅनेजरशी सूत जुळलं; दोघांनी पळून जाऊन लग्न केलं, फोटो व्हायरल झाल्यानंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ

bihar latest news : २८ वर्षीय शिक्षिका आणि शाळेच्या मॅनेजरने पळून जाऊन लग्न केल्याचे समोर आलं आहे. दोघांचे लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Vishal Gangurde

२८ वर्षीय शिक्षिकेने ६० वर्षीय मॅनेजरसोबत लग्न केलं

दोघांनी नेपाळमध्ये मंदिरात जाऊन केलं लग्न

कुटुंबीयांनी अपहरण आणि धर्मांतराचा केलाय आरोप

बिहारच्या मुजफ्फरपुर जिल्ह्यातील औराई भागातून एक आगळीवेगळी लव्हस्टोरी समोर आली आहे. वय, धर्म आणि समाजाचे बंधन तोडून दोघांनी लग्न केलं आहे. खासगी शाळेचे ६० वर्षीय मॅनेजर राकेश शाह आणि त्यांच्या शाळेतील २८ वर्षीय शिक्षिका शाइस्ता परवीन यांनी पळून जाऊन लग्न केलं आहे. दोघांनी नेपाळमध्ये मंदिरात लग्न केलं. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर शाइस्ताच्या कुटुंबीयांनी राकेश यांच्यावर गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश शाह हे औराई भागात एक खासगी शाळा चालवतात. त्याच शाळेत शाईस्ता शिक्षिका आहे. दोघेही एकाच शाळेत काम करतात. कामाच्या ठिकाणी दोघांमध्ये प्रेम वाढलं. दोघे १८ फेब्रुवारीनंतर अचानक बेपत्ता झाले. दोघांनी नेपाळमध्ये जाऊन एका मंदिरात दोघांनी लग्न केलं.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये दोघेही एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहे. या लग्नावर शाइस्ता यांनी म्हटलं की, 'मी माझ्या मर्जीने लग्न केलं आहे. मी माझ्या निर्णयाविषयी समाधानी आहे. माझे पती राकेशच्या कुटुंबीयांना कोणीही त्रास देऊ नये. माझं कोणीही अपहरण केलेलं नाही'.

शिक्षिका शाइस्ताच्या भावाने गंभीर आरोप केले आहेत. तिच्या भावाने मॅनेजरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भावांचं म्हणणं आहे की, 'राकेश शाह यांनी माझ्या बहि‍णीचं बळजबरीने लग्न आणि धर्मांतरासाठी अपहरण केलं आहे. राकेश शहा यांच्यासह त्यांची पत्नी, मुलीसहित ७ जणांच्या नावाचा उल्लेख तक्रारीत म्हटलं आहे.

दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत. दोघांच्या लग्नामुळे परिसता तणावाचं वातावारण निर्माण झालं आहे. शाळेचे मॅनेजर आणि शाळेला टाळा लावण्यात आला आहे. औराई पोलीस स्टेशनचे प्रभारी राजा सिंह यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू आहे. व्हायरल व्हिडिओचाही तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी गावात नाकाबंदी देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silent Heart Attack: या 6 व्यक्तींना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो?

Maharashtra News Live Update: भिमाशंकरच्या दुरवस्थेवर सुप्रिया सुळेंची टीका; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार

Manoj Jarange : मोठी बातमी! एकनाथ शिंदें आज परभणी दौऱ्यावर, मनोज जरांगेंनी दिला इशारा

Bonus 2026 : दसऱ्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट? ₹7,000 ऐवजी मिळणार ₹21,000

Chutneys for weight loss: काही केल्या पोटावरची चरबी जातच नाहीये? या 5 प्रकारच्या चटणी करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT