Physiotherapist Jumps from 9th Floor Saam
देश विदेश

२८ वर्षाच्या महिला डॉक्टरने ९ व्या मजल्यावरून उडी मारली, महिन्याभरात होणार होतं लग्न, नेमकं झालं काय?

Surat physiotherapist suicide mystery : सुरतमधील २८ वर्षीय फिजिओथेरपिस्ट डॉ. राधिका कोटाडिया यांनी कॅफेच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. लग्नाच्या महिनाभर अगोदर झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली.

Namdeo Kumbhar

  • डॉ. राधिका कोटाडिया यांनी एका कॅफेच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

  • राधिका आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये वाद सुरू होते व त्यामुळे ती मानसिक तणावात होती.

  • घटनास्थळावरून मोबाईल, हँडबॅग आणि वैयक्तिक कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली.

  • लग्नाच्या महिनाभर आधी झालेल्या या मृत्यूमुळे कुटुंबीय आणि समाजात धक्का बसला.

Why Dr. Radhika jumped from 9th floor in Surat : गुजरातमधील सुरतमध्ये २८ वर्षीय फिजिओथेरपिस्ट महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. जानेवारी २०२६ मध्ये तिचे लग्न होणार होते, पण त्याआधीच तिने आयुष्याचा दोर कापला. मृत महिलेचे नाव डॉ. राधिका जमानभाई कोटाडिया असे आहे. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी राधिका यांनी सरथाना परिसरातील बिझनेस हब इमारतीमधील एका कॅफेच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवले. जिथे आयुष्य संपवले त्या कॅफेमध्ये ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत वारंवार जात होती. त्याच्यासोबत वाद झाल्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.

डॉ. राधिका एका खासगी रुग्णालयात काम करत होती. काही दिवसांपूर्वीच तिचे लग्न झाले होते. होणार्‍या नवऱ्यासोबत वाद होत होते, त्यामुळे राधिका मानसिक तणावात होती, त्यामधूनच तिने टोकचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. त्या कॅफेमधील लोकांनी अचानक एका तरुणीला पडताना पाहिले, त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली तात्काळ दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून राधिकाचा मोबाईल फोन, हँडबॅग आणि इतर वैयक्तिक कागदपत्रे जप्त केली आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, राधिका या फिजिओथेरपिस्ट म्हणून एका खासगी रूग्णालयात काम करत होत्या. २१ तारखेला सायंकाळी डॉ. राधिका २०-२५ मिनिटे कॅफेमध्ये बसली होती. त्यानंतर रेलिंगकडे गेली अन् उडी मारली. राधिकाचा जानेवारीमध्ये साखरपुडा आणि नंतर लग्न निश्चित झाले होते. सुरत पोलिसांनी डॉक्टरच्या मोबाईल चॅट आणि कॉल रेकॉर्डिंग काढून तिच्या भावी होणाऱ्या नवऱ्याला ती या कॅफेमध्ये अनेकवेळा आली होती, असे समजलेय.

डॉ. राधिका ही जामनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे वडील एका डायमंड कंपनीत काम करतात. तर ती फिजिओथेरपिस्ट म्हणून खासगी क्लिनिक चालवते. ती तिच्या साखरपुड्याबद्दल आणि लग्नाबद्दल खूप आनंदी होती. घटनेच्या दिवशी ती नेहमीप्रमाणे तिच्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये गेली. त्यानंतर, संध्याकाळी काम संपवून, ती कॅफेमध्ये गेली. फोनवर कुणासोबत तरी बोलली आणि टोकाचे पाऊल उचलले.

जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही आत्महत्येच्या विचारांनी ग्रासले असेल तर येथे मदत घ्या | मानसिक आरोग्य हेल्पलाइन्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : क्रिकेटपटूच्या बहिणीने तान्या मित्तलच्या कानाखाली मारली? बिग बॉसच्या घरात घडलं काय? पाहा VIDEO

Maharashtra Politics: फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा कायम? निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत धुसफूस

Cyclone Alert :  चक्रीवादळाचा इशारा, हिवाळ्यात पाऊस धुमाकूळ घालणार, या राज्यांना अलर्ट

PM Matru Vandana Scheme: सरकारची खास योजना! गरोदर महिलांना मिळतात ११,००० रुपये; योजनेत अर्ज कसा करावा?

Pune : पुणे पोलिसाची हेराफेरी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना हात आखडता, १०५ जणांसाठी फक्त ३० बुके?

SCROLL FOR NEXT