Parvathy Mohanan Parvathy Mohanan/Instagram
देश विदेश

Success Story : पार्वतीने छंदातून सुरु केला व्यवसाय, महिन्याला करतेय लाखोंची उलाढाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

success story news : आपला छंद, आवड ही प्रत्येकजण फावल्या वेळात जोपासत असतो. पण जर आपल्या आवडीला व्यवसायात रूपांतरित केलं तर काय यश पायाशी लोळण घालू शकतं. होय.. केरळमधील २३ वर्षीय पार्वती मोहन हिने हे व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्यांना नवा मार्ग दाखवलाय. फक्त छंद म्हणून पार्वती मोहन हिने घराजवळ सुरुवातीला बागेत (lush garden) विविध फुलांची लागवड केली. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेल्या पार्वती हिने नोकरी करत करत आपल्या घराजवळ lush garden सुरु केलं. सुरुवातीला फक्त ५०-१०० ऑर्डर पूर्ण करत होती. आता ती महिन्याला एक लाख रुपयांपर्तंची कमाई करत आहे. पार्वतीची ही सक्सेस स्टोरी अनेकांना प्रेरणा देणारी ठरु शकते. The Better India या सकेंतस्थळानं पार्वती मोहनन हिच्या यशाची स्टोरी सांगितली.

२३ वर्षीय पार्वती मोहनन ही केरळमधील अलप्पुझा येथे मुहम्म गावतील आहे. ती कोची येथे सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून कार्यरत आहे. २०१९ मध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पार्वतीने सर्वांप्रमाणेच नोकरी करण्यास सुरुवात केली. पण आठवडाभर काम करुन थकून घरी आल्यानंतर फावल्यावेळात मूळच्या गावी मुहम्मद गावात निसर्गरम्य ठिकाणी portulaca शेती lush garden सुरु केलं. छंद म्हणून पार्वतीने सुरु केलेला प्रवास आज यशाच्या शिखारवर पोहचला आहे. फक्त अर्धा एकरमध्ये पार्वतीने ल्युश गार्डनर सुरु केले होते. पार्वती सध्याच्या घडीला दररोज ५० ते १०० ऑर्डर पूर्ण करते. त्यामधून पार्वतीला महिन्याला तब्बल एक लाख रुपयांची कमाई होते.

छंद म्हणून सुरु केला व्यवसाय -

पार्वती मोहनन हिने २०१९ मध्ये आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. कोरोना महामारीमध्ये सर्वकाही बंद होतं.त्यावेळी ती आपल्या घरी परतली. त्यावेळी तिने छंद म्हणून घराजवळ अर्धा एकरमघध्ये ल्युश गार्डनर सुरु केले. नोकरी करत असताना छंद म्हणून सुरु केलेला व्यवसाय आज मोठी भरारी घेतली आहे. आज पार्वती महिन्याला लाखोंमध्ये कमाई करत आहे.

पार्वती काय म्हणाली?

पार्वती मोहनन हिच्या यशामुळे अनेकांना नक्कीच प्रेरणा मिळाली असेल. नोकरीतील तणावातून या कामामुळे मला आराम मिळतो. मी जेव्हा सकाळी लवकर उठते, तेव्हा बागेतील फुळ-झाडांमुळे फ्रेश वाटते. या दोलायमान फुलांकडे पाहून खूप ताजेतवाने आणि तणावमुक्त वाटते अशे पार्वतीने सांगितले.

पार्वतीच्या घरी आधीच portulaca चं छोटेसं प्लँट्स होतं. त्यामध्ये तिने स्थानिक विक्रेत्याकडून आणखी0 प्रकारांच्या प्लँट्सची खरेदी केली. त्यानंतर फेसबुकवर या प्लँठ्सची काही छायाचित्रे पोस्ट केली, त्यानंतर प्रतिसाद चांगला मिळाला. त्यामधून व्यवसायाची सुरुवात झाली. फेसबूकवरुन सर्वात आधी दहा ऑर्डर मिळाल्या, त्यानंतर मात्र व्यवसाय करण्याचा विचार केल्याचं पार्वतीने सांगितले.

विदेशातही मागणी -

पार्वती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती, त्यावेळी प्लँट खरेदी करण्यासाठीही तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. प्लँटच्या काही जातीच्या किंमती या पाच हजार रुपयांपर्यंत होत्या. पण मला त्या गार्डनमध्ये हव्या होत्या. पण मी जिद्द सोडली नाही. मिळालेला नफा व्यवसायतच गुंतवला. पार्वतीचा व्यवसाय आता सगळ्या भारतात सुरु आहेच. त्याशिवाय थायलंड आणि ब्राझील येथेही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जवळपास ३०० ठिकाणी व्यवसाय सुरु आहे. पार्वती आपली नोकरी करत आठवड्याच्या सुट्टीला गावी येऊन ल्युस गार्डनची काळजी घेत असते. इतर दिवशी लक्ष देण्यासाठी दोन महिला कामाला ठेवल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT