School Girl Mark Sheet:  Saamtv
देश विदेश

Gujrat News: अजब गजब... गणितात २०० पैकी २१२ अन् भाषेत २११ गुण; मुलीचं मार्कशीट व्हायरल

School Girl Mark Sheet: गुजरातमधील एका शाळेने दिलेला निकाल पाहून सर्वजण थक्क झाले. या शाळेतील इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला कमाल गुणांपेक्षाही अधिक मार्क मिळाले. ज्याचा फोटो सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे

Gangappa Pujari

मे महिना सुरू होताच शाळा, महाविद्यालयांचे वार्षिक निकाल जाहीर होतात. परीक्षेत कोणाला किती मार्क मिळाले? कोणी बाजी मारली? याबाबत विद्यार्थ्यांना धाकधुक तर पालकांना चिंता लागलेली असते. मात्र गुजरातमधील एका शाळेने दिलेला निकाल पाहून सर्वजण थक्क झाले. या शाळेतील इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला कमाल गुणांपेक्षाही अधिक मार्क मिळाले. ज्याचा फोटो सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.

गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीला तिचे निकालपत्र मिळाले तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. चौथीच्या विद्यार्थ्याला दोन विषयांत कमाल गुणांपेक्षा जास्त गुण देण्यात आले. शाळेच्या या चुकीमुळे शिक्षण व्यवस्थेबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. या मार्क लिस्टचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वंशीबेन मनीषभाई असे या मुलीचे नाव आहे. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या वंशीबेनला गुणपत्रिका मिळाली तेव्हा तिला दोन विषयांत मिळालेले गुण पाहून सर्व जण थक्का झाले. वंशीबेनला गुजराती विषयात २०० पैकी २११ आणि गणित विषयात २०० पैकी २१२ गुण मिळाले होते. नंतर निकाल तयार करताना चूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर सुधारित निकाल जाहीर करण्यात आला.

School Girl Mark Sheet:

सुधारित निकालात तिला गुजरात भाषा विषयात 200 पैकी 191 गुण आणि गणितात 200 पैकी 190 गुण देण्यात आले. मात्र, इतर विषय बदलले नाहीत. नवीन निकालात वंशीबेनला 1000 पैकी 934 गुण मिळाले आहेत. विद्यार्थिनीने घरच्यांना मार्कलिस्ट दाखवल्यावर शाळेची चूक उघडकीस आली. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत- चित्रा वाघ|VIDEO

Kalyan : घरावरील झाड हटवायला वीज खंडीत करण्यासाठी पैशांची मागणी; महिलेचा महावितरण कर्मचाऱ्यावर आरोप

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

SCROLL FOR NEXT