19 Metro City Crime Rate Saam Digital
देश विदेश

19 Metro City Crime Rate : खरंच कोलकाता सुरक्षित शहर आहे का ? ममतांचा दावा खरा की खोटा, NCRB चा अहवाल काय सांगताे?

Sandeep Gawade

कोलकाता आणि मुंबई परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये महिलावरील अत्याचाराच्या घटनांवरून देशभारत चर्चेत आहेत. कोलकातामधील एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली तर, मुंबईनजीक बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. काल पश्चिम बंगाल सरकारने अत्याचारातीलच्या घटनेतील दोषीला फाशी देणारं 'अपराजिता विधेयक' विधानसभेत मंजूर केलं.

अपराजिता विधेयक' सादर करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. केंद्र सरकारने स्वतः कोलकाता शहराचे सर्वात सुरक्षित शहर म्हणून वर्णन केले आहे, परंतु आता भाजप आरजी कराच्या घटनेवरून राजकारण करत असल्याचा आरोप केला. यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी एनसीआरबीच्या आकडेवारीचा हवाला दिला. NCRB ही केंद्र सरकारची संस्था असून दरवर्षी गुन्ह्यांच्या आकडेवारीवर अहवाल प्रसिद्ध करते.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार कोलकाता सलग तीन वर्षांपासून सर्वात सुरक्षित मेट्रो शहर राहिलं आहे. NCRB दरवर्षी 19 मेट्रो शहरांची गुन्ह्यांशी संबंधित आकडेवारी जाहीर करते. यामध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोईम्बतूर, दिल्ली, गाझियाबाद, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कानपूर, कोची, कोलकाता, कोझिकोड, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा, पुणे आणि सुरत यांचा समावेश आहे.

एनसीआरबीच्या अहवालानुसार 2022 मध्ये या 19 मेट्रो शहरांमध्ये 8.53 लाखांहून अधिक गुन्हेगारी प्रकरणे नोंदवण्यात आली होती. ही सर्व प्रकरणे दखलपात्र गुन्हे होते. म्हणजेच असे गुन्हे ज्यात पोलीस वॉरंटशिवायही अटक करू शकतात. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये या गुन्ह्यांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे.2022 मध्ये नोंदवलेल्या सर्व प्रकरणांपैकी दीड टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच 12,213 प्रकरणे कोलकातात नोंदवण्यात आली, तर दिल्लीत सर्वाधिक ३.१८ लाख प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

कोलकात्यात दर 1 लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी गुन्हेगारीचं प्रमाण आहे. एक लाख लोकसंख्येमागे ८६.५ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 2021 मध्ये हीच संख्या 103.4 आणि 2020 मध्ये 129.5 होती. दिल्लीत सर्वाधिक 1952.5 गुन्हेगारीचं प्रमाण होतं, यानंतर कोची 1358.2 आणि इंदूरमध्ये 1251.8 गुन्हेगारीचं प्रमाण नोंदवलं गेलं आहे.

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ

NCRB डेटा दर्शविते की 2022 मध्ये 19 मेट्रो शहरांमध्ये महिलांवरील 48,755 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हा आकडा 2021 च्या तुलनेत 12.3 टक्क्यांनी अधिक आहे. मात्र, कोलकात्यात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. 2021 मध्ये कोलकातामध्ये महिलांवरील अत्याचाराची 1,783 प्रकरणे नोंद करण्यात आली होती. 2022 मध्ये ही संख्या 1,890 पर्यंत वाढली. कोलकामध्ये महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण 1 लाख लोकसंख्येमागे 27.8 आहे. तर कोईम्बतूरमध्ये 12.9 आणि चेन्नईमध्ये 17.1 आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT