Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking News : १७ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या, आरोपी निघाला सैन्यदलातील जवान

Prayagraj Crime News : प्रयागराजमध्ये तरुणीवर सैन्यदलातील जवानाने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून हत्या केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

लग्नाला नकार दिल्याने तरुणीची हत्या

आरोपी जवानाने विद्यार्थिनीवर शेतात नेऊन चाकूने हल्ला केला

मृतदेह जमिनीत पुरून घटनास्थळावरून पळ काढला

गावकऱ्यांच्या मदतीने आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक

प्रयागराज मधून संतापजनक बातमी समोर आली आहे. सैन्यदलातील एका सैनिकाने ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे या या तरुणाला पीडितेने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून त्याने ही हत्या केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपीचं नाव हर्षवर्धन हर्षवर्धन सिंग उर्फ ​​दीपक असे नाव आहे तर पीडित मुलीचे नाव साक्षी यादव असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी साक्षी आणि हर्षवर्धन सिंग यांची इंस्टाग्रामवर मैत्री झाली. काही दिवसात त्यांच्यातील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. याच दरम्यान हर्षवर्धनचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरले. मात्र आरोपी हर्षवर्धनाला पीडितेशी लग्न करायचे असल्याने त्याने पीडित तरुणीला त्यासाठी जबरदस्ती केली. मात्र साक्षीने या लग्नाला विरोध केला. साक्षीने नकार दिल्यावर हर्षवर्धनने तिला संपवण्याचा कट रचला.

संतापलेल्या हर्षवर्धनने तिला भेटण्याच्या निमित्ताने एका बागेत बोलवले. त्यानुसार दोघेही भेटले आणि हर्षवर्धनने साक्षीला आपल्या गाडीवर बसवून दूर एका शेतात नेले. तिथे पीडितेवर चाकूने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर कोणाला संशय येऊ नये यासाठी आरोपीने तरुणीचा मृतदेह शेतामध्ये गाडला. आणि घटनास्थळावरून पळ काढला.

मात्र दुसऱ्यादिवशी गावातील काही नागरिकांना तरुणीचा एक हात जमिनीतून बाहेर असल्याचं दिसून आल्याने मोठा गोंधळ उडाला. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. पोलीस तपासात घटनास्थळी मृतदेहाच्या शेजारी कॉलेज बॅग आढळली शिवाय आरोपीचा मोबाईल नंबर देखील सापडला.

पोलिसांनी सगळी सूत्र तातडीने हलवली आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून हत्येचे सगळे धागेदोरे सोडवले. पोलिसांनी आरोपी हर्षवर्धन उर्फ दिपकला ताब्यात घेतले असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahalaxmi Rajyog: मंगळ चंद्रासोबत युती करून बनवणार खास योग; 'या' राशींवर पडणार पैशांच पाऊस

Mangalsutra Designs: लग्नसराईसाठी नविन मंगळसूत्र खरेदी करायचंय? मग ही पारंपारिक आणि ट्रेंडी डिझाईन आहेत परफेक्ट चॉईस

Maharashtra Live News Update: रिक्षा आणि खासगी वाहन चालकांचा सुटकेचा श्वास; सीएनजी गॅस सुरू

Winter Kidney Care: थंडीत कमी पाणी पिताय? किडनी आणि ब्रेन स्ट्रोकचा वाढेल धोका, तज्ज्ञांचा इशारा

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांसोबतच्या कॅबिनेट बैठकीला दांडी; शिंदे गटाच्या मंत्र्यांची नाराजीची ६ कारणे|VIDEO

SCROLL FOR NEXT