Pune Water Supply : पुण्यात गुरुवारी पाणीबाणी! 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद

Pune Water Cut News : पुण्यात २१ नोव्हेंबर रोजी खडकवासला - पर्वती जलवाहिनी जोडणी व फ्लो मीटर बसविण्याच्या कामासाठी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी उशिरा कमी दाबाने पुरवठा सुरू होईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
Pune Water Supply : पुण्यात गुरुवारी पाणीबाणी! 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद
Saam tv
Published On
Summary

पुण्यात २१ नोव्हेंबर रोजी २४ तासांचा पाणीपुरवठा खंडित

खडकवासला–पर्वती जलवाहिनी जोडणी आणि फ्लो मीटर बसविण्याचे महत्त्वाचे काम

शुक्रवारी कमी दाबाने पुरवठा सुरू

नगर रोड परिसराला भामा आसखेडमधून नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! शहरात येत्या २१ नोव्हेंबर रोजी २४ तास पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. खडकवासला धरण ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान जलवाहिनी जोडणे, जलवाहिनीवर मीटर बसविणे या कारणासाठी गुरुवारी बहुतांश संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी कमी दाबाने पुरवठा सुरु होईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणातून पर्वती जलकेंद्रापर्यंत ३ हजार मिमी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. खडकवासला धरणातून दोन १४०० मिमी व्यासाची जलवाहिनी या ३ हजार मिमी व्यासाच्या जलवाहिनीला जोडण्यात येणार आहे. तसेच त्यावर फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे . या कारणास्तव येत्या २१ नोव्हेंबर रोजी म्हणजेच गुरुवारी २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune Water Supply : पुण्यात गुरुवारी पाणीबाणी! 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद
Maharashtra Politics : मराठवाड्यात सगे-सोयऱ्यांचे वर्चस्व, आमदारांची - मंत्र्यांची मुले-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

नगर रस्त्यावर भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा होणाऱ्या भागातील पाणी पुरवठा गुरूवारी सुरू राहणार आहे. तेथे कोणताही अडथळा येणार नाही. उर्वरित शहराच्या भागात गुरुवारी पाणी बंद असेल. तसेच २४ तासानंतर शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी शहरात उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होईल, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

Pune Water Supply : पुण्यात गुरुवारी पाणीबाणी! 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद
Bank Robbery : मध्यरात्री कॅनरा बँकेत दरोडा; दबक्या पावलांनी आले, कॅमेरे फोडले अन् लाखो घेऊन पसार

पाणी पुरवठा बंद असलेला भाग पुढील प्रमाणे

पर्वती एमएलआर टाकी, पर्वती एचएलआर टाकी, पर्वती एलएलआर टाकी परिसर, वडगाव शुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, चांदणी चौक टाकी, गांधी भवन टाकी, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, एसएनडीसी एलएलआर टाकी, एसएनडीटी एमएलआर टाकी, चतुःश्रृंगी टाकी, होळकर जलकेंद्र टाकी, खडकवासला जॅकेवेल, वारजे फेज क्रमांक एक व दोन, गणपती माथा, जुने वारजे जलकेंद्र, नव्याने समाविष्ट गावातील गावांचे बूस्टर केंद्र.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com