Corona Cases Update in India Saam TV
देश विदेश

Corona Cases Today: दिलासादायक! देशात गेल्या 24 तासात 1581 नवे कोरोनाबाधित रुग्ण

देशात गेल्या 24 तासामध्ये कोरोनाचे (Corona) 1581 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: देशात गेल्या २४ तासामध्ये कोरोनाचे (Corona) १,५८१ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यानंतर, देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ४,३०,१०,४ कोटी ३० लाख १० हजार ९७१ वर येऊन पोहोचली आहे. तसेच, देशात सक्रिय कोरोनाबाधितांची (Corona ) संख्या २३,९१३ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशामध्ये मागील २४ तासामध्ये ३३ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमवाला आहेत. (Corona Cases Update in India)

हे देखील पहा-

आतापर्यंत भारतात एकूण कोरोना मृतांची संख्या ५ लाख १६ हजार ५४३ झाली आहे. आतापर्यंत १८१ कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे १८१ कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. सोमवारी दिवसभरामध्ये ३० लाख ५८ हजार ८७९ डोस देण्यात आले आहेत.

त्यानंतर आतापर्यंत एकुण १८१ कोटी ५६ लाख १ हजार ९४४ डोस कोरोना (Corona) लसीचे (vaccines) डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना २ कोटीपेक्षा जास्त प्रतिबंधात्मक लस देण्यात आले आहेत. १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटासाठी बूस्टर डोस देण्यात येत आहे.

जगात अनेक भागांमध्ये कोरोनाच्या संसर्गाच्या रुग्णांमध्ये झाली असलेली वाढ आणि आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये येणाऱ्या समस्या बघता, सरकार १८ वर्षांवर सर्वाना कोरोना लसीचा बूस्टर (Booster) डोस देण्याच्या विचारात आहे. सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली आहे. सध्या आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना कोरोना लसीचे बूस्टर डोस दिले जात आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT