कराची : पाकिस्तानातील कराची येथील मलीर तुरुंगातून तब्बल १०० हून अधिक कैदी पळून गेले आहेत. तुरुंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, काल सोमवारी कराचीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कैद्यांना बॅरेकमधून बाहेर काढण्यात आले. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, या परिस्थितीचा फायदा घेत १०० हून अधिक कैदी मुख्य गेटमधून पळून गेले.
यापैकी सुमारे ८६ कैद्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात आलं आहे. अनेक अजूनही फरार आहेत. सिंध प्रांताचे गृहमंत्री झिया-उल-हसन लंजर यांनी आज मंगळवारी पहाटे याची पुष्टी केली. यापूर्वी अनेक माध्यमांमध्ये असं म्हटलं जात होते की, कैदी भिंत तोडून पळून गेले होते. प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, कोणतीही भिंत तोडली गेली नाही, चेंगराचेंगरीच्या वेळी सर्व कैदी मुख्य गेटमधून पळून गेले.
गृहमंत्री लांजर म्हणाले की, भूकंपानंतर ७०० ते १००० कैद्यांना बॅरेकमधून बाहेर काढण्यात आले. या गोंधळात सुमारे १०० कैदी मुख्य गेटमधून पळून गेले. आतापर्यंत ४६ पळून गेलेल्या कैद्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात आलं आहे, तर अनेक कैदी अजूनही फरार आहेत. तुरुंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, शोध मोहीम अजूनही सुरू आहे. या कारवाईत स्पेशल सिक्युरिटी युनिट, रॅपिड रिस्पॉन्स फोर्स, रेंजर्स आणि फ्रंटियर कॉर्प्स यांचे पथके एकत्र काम करत आहेत.
घटनेनंतर लगेचच रेंजर्स आणि एफसीने तुरुंगाचा ताबा घेतला. आयजी जेल, डीआयजी जेल आणि तुरुंगमंत्री घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेत एका कैद्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. चार सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. गृहमंत्र्यांनी कबूल केलं की, प्रशासकीय निष्काळजीपणा देखील या घटनेचं कारण असू शकते.
मुख्यमंत्री मुराद अली शाह यांना संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्यांनी गृहमंत्र्यांना तुरुंगात जाऊन परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. सिंध प्रांताचे राज्यपाल कामरान तेसोरी यांनीही या घटनेची दखल घेतली आणि गृहमंत्री आणि आयजी सिंध पोलिसांकडे सर्व कैद्यांना लवकरच अटक करण्याचे आदेश दिले. गृहमंत्री लांजर म्हणाले की, प्रत्येक पळून गेलेल्या कैद्याची ओळख आणि नोंदी उपलब्ध आहेत. त्यांच्या घरांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात छापे टाकले जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.