Pune News : गणितात पास करून देतो म्हणत, पुण्यातील 'या' कॉलेजमध्ये शिक्षकाचा रात्रीस खेळ चाले; शहरात खळबळ

Pune Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, प्राध्यापक सातव हा कॉलेजमध्ये दुपारी झालेला पहिल्या वर्षांचा इंजिनियरींगचा गणिताचा पेपर रात्री कॉलेजमध्ये इंजिनीयरींगचे शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांना पुन्हा लिहिण्यासाठी देत होता.
Pune Wagholi Parvatibai Genba Moze College teacher
Pune Wagholi Parvatibai Genba Moze College teacher Saam Tv News
Published On

अक्षय बडवे, साम टिव्ही

पुणे : इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षीचा गणिताचा पेपर हा सर्व विद्यार्थ्यांचा अवघड विषय. हा गणिताचा पेपर पास करून देण्यासाठी पुण्यातील वाघोली भागात असलेल्या पार्वतीबाई गेनबा मोझे या महाविद्यालयातील एका प्रोफेसरने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत या प्रोफेसरसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. प्राध्यापक प्रतिक किसन सातव यासह आदित्य खिलारे, अमोल नागरगोजे आणि अनिकेत रोडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राध्यापक सातव हा कॉलेजमध्ये दुपारी झालेला पहिल्या वर्षांचा इंजिनियरींगचा गणिताचा पेपर रात्री कॉलेजमध्ये इंजिनीयरींगचे शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांना पुन्हा लिहिण्यासाठी देत होता.

Pune Wagholi Parvatibai Genba Moze College teacher
Vaishnavi Hagawane Case : पंखा वैष्णवीचं ७१ किलो वजन झेलू शकतो का? रुपाली चाकणकरांनी दिली महत्वाची माहिती

आरोपीकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गणित २ या विषयाचे लिहिलेले उत्तरपत्रिकेचे ६ बंडल तसेच रोख रक्कम २ लाख ६ हजार रुपये आणि उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रूमची चावी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणित २ या विषयामध्ये नापास होण्याची भिती वाटते अशा विद्यार्थ्यांना हेरून त्यांच्याकडून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी संगनमत करुन १० ते ५० हजार रुपये घ्यायचा.

४० वर्षाच्या नानासाहेबाचे ३७ वर्षीय महिलेसोबत जबरदस्ती संबंध

पुण्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून, अलिकडे एका ४० वर्षीय नराधमानं एका ३७ वर्षीय विवाहित महिलेला लग्नासाठी धमकावत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं अत्याचार केल्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढले आणि ते तिच्या वडिलांना पाठवण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव टाकला.

या प्रकाराला कंटाळून पीडित महिलेनं अखेर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी नानासाहेबविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.

Pune Wagholi Parvatibai Genba Moze College teacher
Ahmedabad Weather IPL Final 2025 : अहमदाबादमध्ये हवामानाबाबत मोठी अपडेट, सामन्यात पाऊस खेळ घालणार? IPLची ट्रॉफी कुणाकडे जाणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com