King Cobra Snake Saam TV
देश विदेश

King Cobra : अरे बापरे! कारमध्ये १० फूट लांबीचा कोब्रा; २०० किमी फिरला, अचानक नजरेस पडला अन्...

हा धक्कादायक प्रकार केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातून समोर आलाय.

साम टिव्ही ब्युरो

King Cobra Snake Video : साप बघितला तर भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र, एका व्यक्तीने नकळत कोब्रा सापासोबत चक्क 200 किलोमीटरचा प्रवास केलाय. वास्ताविक आपल्या कारमध्ये साप (Cobra Snake) आहे आणि तो आपल्यासोबत प्रवास करतोय, याची कल्पना या व्यक्तीला नव्हती. जेव्हा त्याला हे समजलं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हा धक्कादायक प्रकार केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातून समोर आलाय. (King Cobra Snake Car Viral Video)

कोट्टायममधील अर्पुकारा येथील वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (31 ऑगस्ट) त्यांनी एका कारमधून 10 फूट लांब असलेल्या कोब्रा सापाला रेस्क्यू केलं. हा साप कारच्या इंजिनमध्ये लपून बसला होता. इतकंच नाही तर, या कोब्रा सापाने कारमधून तब्बल 200 किलोमीटरचा प्रवास देखील केला. या प्रवासादरम्यान, तो कारच्या समोरील बाजूस लपून बसला होता.

कारमध्ये साप कसा आला?

कार मालकाच्या माहितीनुसार, एका कामासाठी ते आपल्या गावावरून म्हणजे अर्पुकाराहून मलप्पुरमला गेले होते. तेथील काम पूर्ण (Viral Video) झाल्यानंतर ते परत अर्पुकारच्या दिशेने रवाना झाले. यावेळी ते वाझिकडावू येथील एका चौकीजवळ चहा घेण्यासाठी थांबले. तेव्हा परिसरातील काही लोकं लाठ्या-काठ्या घेऊन त्यांच्याकडे आली. तुमच्या कारच्या बोनेटमध्ये साप घुसला असल्याचं या व्यक्तींनी कारमालकाला सांगितलं. (King Cobra Snake News)

या प्रकारानंतर कारमालकाने कारचं बोनेट उघडलं, संपूर्ण कारची झाडझडती सुद्धा घेतली. मात्र त्यांना काही साप दिसून आला नाही. लोकांना भ्रम झाला असावा, असं समजून ते कार घेऊन घटनास्थळावरून निघून आले. दरम्यान, रविवारी ते घरातील गेटमधून कार बाहेर काढत असताना, कुटुंबातील एका सदस्याला कारच्या समोरच्या बाजूने साप लटकलेला दिसला.

आरडाओरड झाल्यानंतर त्यांनी पुन्हा कारची कसून तपासणी केली. दरम्यान तेव्हा सुद्धा कारमध्ये साप दिसून आला नाही. या घटनेनंतर त्यांनी कार चालवणेच बंद केले. आठ दिवसानंतर म्हणजेच बुधवारी पुन्हा त्यांना कारच्या बोनेटमध्ये साप दिसून आला. तेव्हा त्यांनी याची माहिती तातडीने वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी हजर झाले आणि त्यांनी कारच्या बोनेटमधून 10 फूट लांबीच्या कोब्रा सापाला बाहेर काढलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT