Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Attacked On Young Girl By Koyta : पुणे हादरले! दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती टळली, पोलीस ठाण्यासमोरच विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला

Koyta Attack On MPSC Student Girl In Sadashiv Peth: याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

Attacked On MPSC Student Girl In Pune: पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या (Pune Crime) घटना वाढत चालल्या आहेत. गुन्हेगारांवर पोलिसांचा (Pune Police) वचकच राहिला नसल्याचे चित्र वारंवार पुण्यात समोर येत आहेत. अशामध्ये नुकताच झालेल्या दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली. पुण्यामध्ये एका तरुणीवर पोलीस ठाण्यासमोरच (Police Station) कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजच्या विद्यार्थिनीवर तिच्याच मित्राने कोयत्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात या तरुणीसोबत तिचा आणखी एक मित्र जखमी झाला आहे. तरुणीवर हल्ला करणारा तरुण आणि तिचा मित्र हे देखील शिक्षण घेत आहेत. पुण्यातील सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) या तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ ही घटना घडली.

पीडित तरुणी कॉलेजला निघाली होती. तिच्यासोबत तिचा मित्र देखील होता. तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. यावेळी आरोपीने तिच्या मित्रावर देखील हल्ला केला. हल्ल्यानंतर ही तरुणी आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावरुन पळू लागली. तिच्या मागे आरोपी कोयता घेऊन लागला होता तरी देखील कुणीच तिच्या मदतीला धावून आले नाही.

जखमी अवस्थेत तरुणीला धावताना पाहून एक तरुण तिच्या मदतीला धावून आला. कोयता हातात असलेला तरुण मुलीच्या डोक्यात वार करणार तेवढ्यात लेशपाल जवळगे नावाचा तरुणाने आरोपीच्या हातातील कोयता पकडला आणि त्याला रोखले. त्यानंतर इतर लोकं पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला त्यांनी चोप दिला. त्यानंतर पोलीसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं.

जुन्या प्रेम प्रकरणाचा राग मनात धरुन या तरुणाने तरुणीवर कोयता हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात तरुणी आणि तिचा मित्र जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

मुलं ही पालकांची मालमत्ता नाहीत! हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पालकांनो हे नक्की वाचा

Mumbai : दादरच्या पॉश एरियात भयंकर प्रकार! प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

SCROLL FOR NEXT