West Indies vs Netherlands: नेदरलँडचा भीमपराक्रम! Super Over मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला, VIDEO पाहा

Super Over in ODI World Cup Qualifier: २ वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिज संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या रोमांचक सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने लागला आहे.
west indies  vs nederland
west indies vs nederland twitter

ICC ODI WC 2023 Qualifier: वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचा थरार यावर्षी भारतात रंगणार आहे. याच स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वर्ल्ड कप पात्रता फेरीतील सामने सुरू आहेत. या सामन्यात सोमवारी (२६ जून) वेस्ट इंडिज आणि नेदरलँड हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यात २ वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिज संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या रोमांचक सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने लागला आहे.

west indies  vs nederland
Team India Bowling : वेस्ट इंडिजचं आता काही खरं नाही! टीम इंडियात झाली बुमराह- शमीपेक्षाही घातक गोलंदाजाची एंट्री

प्रथम फलंदाजी करत असलेल्या वेस्ट इंडिज संघाने या सामन्यात ५० षटक अखेर ६ गडी बाद ३७४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँडने देखील ९ गडी बाद ३७४ धावा केल्या होत्या.

हा सामना बरोबरीत सुटला होता, त्यावेळी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरच्या षटकात नेदरलँड संघाने प्रथम फलंदाजी करताना ३० धावा ठोकल्या. हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिज संघाला विजयासाठी ६ चेंडूंमध्ये ३१ धावांची गरज होती.

लोगन वॅन विकची तुफान फटकेबाजी ..

सुपर ओव्हरच्या सामन्यात नेदरलँड संघाकडून लोगन वॅन विक फलंदाजी करण्यासाठी आला होता. तर वेस्ट इंडिज संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी जेसन होल्डर गोलंदाजीला आला होता. लोगन वॅन विकने या षटकात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत ३० धावा ठोकल्या. या धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघाला अवघ्या ८ धावा करता आल्या.

वेस्ट इंडिज संघाकडून प्रथम फलंदाजी करताना निकोलस पुरनने शतकी खेळी केली होती. त्याने ९ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १०४ धावांची खेळी केली. ब्रेंडन किंगने ७६ आणि जॉन्सन चार्ल्सने ५४ धावांची खेळी केली. (Latest sports updates)

वेस्ट इंडिजने दिलेल्या ३७५ धावांचा पाठलाग करताना नेदरलँडने दमदार सुरुवात केली होती. सलामीवीर जोडीने ७६ धावांची भागीदारी केली होती. मात्र ३० व्या षटकापर्यंत नेदरलँडचा संघ गोत्यात अडकला होता. १७० धावांवर नेदरलँडचे ४ फलंदाज माघारी परतले होते. शेवटी तेजा निदामनुरू आणि कर्णधार स्कॉट एडवर्ड्स यांच्यात १४३ धावांची भागीदारी झाली. त्यानंतर लोगन वॅन विकने २८ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर सामना बरोबरीत सुटला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com