Pune Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुणे हादरलं! भररस्त्यात रक्तरंजित थरार, मामा-भाच्यांनी तरुणीला संपवलं, CCTV आला समोर

pimpri chinchwad girl kills : पुण्यात भररस्त्यात रक्तरंजित थरार घडला. मामा-भाच्यांनी तरुणीची हत्या केली. या आरोपींचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

Vishal Gangurde

पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळजनक घटना घडली. पिंपरी-चिंचवडला रात्री अल्पवयीन तरुणीची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या वाल्हेकर वाडीत थरारक घटना घडली. तरुणीच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपींचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या वाल्हेकर वाडीत मामा भाच्यांनी मिळून कोमल जाधव नावाच्या अल्पवयीन तरुणीची चाकूने भोसकून हत्या केली. तरुणीची हत्या करणाऱ्या मामा-भाच्याचा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. उदयभान यादव आणि अभिषेक यादव (भाचा) असे दोघांचे नावे आहेत. तरुणीच्या हत्येनंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या.

भररस्त्यात तरुणीची हत्या

आरोपी उदयभान हा अल्पवयीन तरुणी कोमल जाधव हिच्या घरासमोरच राहायला होता. उदयनभान आणि कोमलमध्ये आर्थिक संबंध होते. आर्थिक वादातून उदयनभान यादव याने भाचा अभिषेक यादवच्या मदतीने रात्री कोमल जाधव हिच्यावर चाकूने वार करून हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

आरोपी सीसीटीव्हीत कैद

कोमल जाधवची भररस्त्यात हत्या करण्यात आली. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, उदयभान आणि अभिषेकने बाईकवरून आले. दोघांनी हेल्मेट घातले होते. कृष्णाई परिसरात दोघांनी कोमलवर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्याच कोमलचा जागीच मृत्यू झाला. कोमल जाधवच्या हत्येने पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे.

दिघीत बाल गुन्हेगाराची हत्या

पिंपरी चिंचवडच्या दिघीत रविवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास एका १७ वर्षीय अल्पवयीन बाल गुन्हेगार मुलाची जुन्या वादातून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी अवघ्या काही तासांतच पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पोलिस पथकाने 3 आरोपींना ताब्यात घेतलं. सोहम शिंदे असं हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन बाल गुन्हेगाराचं नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT