Truck In Sea Of ​​Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

Truck In Sea Of ​​Mumbai: पठ्ठ्यानं थेट मुंबईच्या समुद्रात घुसवला ट्रक; देसी जुगाड आला अंगाशी, पुढे काय घडलं?

तरुणाने आपल्या ट्रकला स्वच्छ करण्यासाठी पर्याय शोधला आणि त्याने ट्रक थेट मुंबईच्या समुद्रात घुसवला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Versova News: वाहन खराब झाल्यावर वाहन वॉशिंग सेंटरमध्ये नेले जाते. येथे धुळीने, चिखलाने माखलेली तुमची कार, दुचाकी अथवा ट्रक अशी सर्वच वाहने स्वच्छ धुऊन मिळतात. पैसे जास्त खर्च व्हायला नकोत यासाठी सर्वच जण पर्याय शोधतात. अशात एका तरुणाने आपल्या ट्रकला स्वच्छ करण्यासाठी पर्याय शोधला आणि त्याने ट्रक थेट मुंबईच्या समुद्रात घुसवला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुंबईच्या वर्सोवा येथे ही घटना घडली आहे. यात एका व्यक्तीने ट्रक धुण्यासाठी देसी जुगाड शोधून काढलाय. देसी जुगाड शोधत या व्यक्तीने आपला ट्रक समृद्र किनारी नेला. तेथे गेल्यावर ट्रक जसजसा पुढे जाऊ लागला तसतसा तो वाळूत खाली फसू लागला.

चालकाने मुख्य रस्ता सोडून ट्रक थेट गणपती विसर्जन करण्यासाठी बनवलेल्या रॅम्पवरुन समुद्रात घुसवला. यानंतर मात्र ड्रायव्हरला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने ट्रक समुद्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना तो अधिकच मातीत घुसू लागला. सायंकाळ झाली अंधार पडू लागला त्यामुळे तरुणने तो ट्रक आहे तिथेच सोडून पळ काढला. नंतर समुद्राला आलेल्या भरतीमुळे ट्रक समुद्राच्या लाटांवर तरंगू लागला आणि थेट किनाऱ्यावरील दगडांना जाऊन धडकला. यामुळे ट्रकच्या बोनटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शिवाय इंजिनमध्ये समुद्राचे खारट पाणी गेल्यामुळे त्यात बिघाड झाला. अखेरीस दुपारी अडीच वाजता क्रेनच्या सहाय्याने ट्रक समुद्रातून बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.

एवढा मोठा प्रताप करुन सदर ट्रक चालक फरार झाला आहे. भारतात देसी जुगाड करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. अनेक व्यक्ती आपल्या रोजच्या कामांमध्ये येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी देसी जुगाड शोधतात. असाच देसी जुगाड या तरुणानेही शोधला मात्र तो त्याच्या चांगलाच अंगलट आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: बारामतीत अपघाताचा थरार! ट्रकने वडिलांसह दोन चिमुकल्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा CCTV VIDEO

मुंबई-पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

Hair Care : घरच्या घरी बनवा हे हेअर जेल, राठ केस होतील मऊ आणि चमकदार

Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT