बायको आणि सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोट सापडल्याने घटनेचा उलगडा Saam Tv
मुंबई/पुणे

बायको आणि सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोट सापडल्याने घटनेचा उलगडा

योगेश हा सध्या बेरोजगार (Unemployed) होता त्यामुळे पत्नी आणि सासरे हे त्याला सतत बोलत असत. त्यांच्यामध्ये नेहमी वाद देखील होत.

अश्विनी जाधव

पुणे : पत्नी आणि सासर्‍याच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसरच्या (Hadapsar) सातववाडी येथे घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या पतीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईट नोट लिहून ठेवली होती. त्यावरुन हडपसर पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी आणि सासर्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. योगेश रुपचंद धनवडे वय 22 असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

हे देखील पहा -

योगेशच्या पत्नी आणि सासर्‍याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. योगेश हा सध्या बेरोजगार (Unemployed) होता त्यामुळे पत्नी आणि सासरे हे त्याला सतत बोलत असत. त्यांच्यामध्ये नेहमी वाद देखील होत आणि या सततच्या वादाला कंटाळून योगेशने सातववाडी येथील घरात 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने पत्नी आणि सासरे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. त्याची ही चिठ्ठी नुकतीच सापडली. त्यावरुन हडपसर (Hadapsar) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : भयंकर अपघात! टॅक्टर-कंटेरनची भीषण धडक, ८ जणांचा मृत्यू, ४३ जखमी

Maharashtra Weather Update : गणरायाच्या स्वागताला पाऊस येणार, राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस, वाचा IMD चा अंदाज

Success Story: मुलाच्या जन्मानंतर केली UPSCची तयारी; चौथ्या प्रयत्नात झाल्या IPS; नित्या राधाकृष्णन यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: मुंबई-नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात

Ganesh Chaturthi: राशीनुसार गणेश चतुर्थीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान कराल? कोणता नैवेद्य दाखवाल हे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT