Police FIR Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत, पुण्यातील तरुणानं टोकाचं पाऊल उचललं, आयुष्य संपवलं!

Pune Police : बंडगार्डन पोलीस ठाण्यात (bund garden police station) याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पोलिस याप्रकरणाचा शोध घेत आहेत.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, पुणे

Pune Latest News, पुणे : नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत म्हणून पुण्यातील (Pune News) एका तरुणानं आयुष्य संपवलं आहे. धक्कादायक म्हणजे, व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तरुणाने टोकाचं पाऊल उचलले आहे. हिंजवडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. अनुप लोखंडे असे आयुष्य संपवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात (bund garden police station) याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पोलिस याप्रकरणाचा शोध घेत आहेत.

पुण्यात (Pune News) व्यसनमुक्ती केंद्रात तरुणानं आयुष्य संपवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत म्हणून टोकाचे पाऊल उचलले. नशेच्या गोळ्या सेवनाची सवय झालेल्या युवकाला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. तिथेच त्याने आयुष्य संपवले. त्याने केंद्रातील स्वच्छतागृहात गळफास लावून जीवन संपवले. हिंजवडी येथील नित्यानंद व्यसनमुक्ती केंद्रात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुपला नशेच्या गोळ्यांचे व्यसन लागले होते. ताडीवाला रोड भागात राहणाऱ्या, दारूचा धंदा करणाऱ्या एका मुलाकडून अनुप नशेच्या गोळ्या घेत असे. एक ऑगस्ट रोजी सारसबाग येथे गेला असता तेथून तो नशेच्या अवस्थेत दुसऱ्या दिवशी घरी आला. हे सगळं बघून त्याच्या आईने त्याला हिंजवडी भागात असलेल्या नित्यानंद व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले, परंतु मंगळवारी पहाटे त्याने बाथरूममध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवले. याप्रकरणानंतर मुलाच्या आईने पोलिसांना पत्र लिहिलेय. पाहूयात त्यामध्ये काय काय आहे ?

विषय- खालील व्यक्तीची चौकशी होवुन मला व माझ्या मुलाला न्याय मिळणेबाबत

उपरोक्त विषयान्वये सविनय सादर की, मी भारती नागेश लोखंडे वय ४० वर्ष रा. ताडीवाला रोड पुणे मो. ७५५९१९५६७० राहणेस आहे. मला दोन मुले असुन त्यातील मोठा मुलगा अनुप नागेश लांखडे हा दि.६/८/२०२४ रोजी मयत झाला आहे. त्यावर माझे सांगणे की, माझा मुलगा अनुप हा दि, ०१/८/२०२४ रोजी रात्री ०७.३० वाजेच्या सुमारास आण्णाभाऊ साठे यांचे जयंती साजरी करणे करीता सारसबाग येथे गेलेला होता. तो सारस बाग येथुन दि. ०२/८/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजेच्या सुमारास घरी कोणत्यातरी नशेत घरी आला होता. त्यामुळे मी त्याला दि.०२/८/२०२४ रोजी हिंजवडी येथे नित्यानंद मेडकील व्यसणमुक्ती केद्रामध्ये भरती केले होते. माझा मुलगा दि. ०२/८/२०२४ रोजी घरी परत आला तेव्हा त्याचेकडे त्याचा मोबाईल व दुचाकी नव्हती व ती आज पर्यत मला परत मिळलेली नाही. तसेच माझा मुला सोबत राहणारे हुड्या, रुपेश, निखील जगताप यांचे राहते घरात भाड्याने राहणारे मुलांची चौकशी होणेस विनंती आहे. तसेच ताडीवाला रोड येथे राहणारा राजु पवळे हा दारुचा धंदा करतो व त्याचा मुलगा नाव माहित नाही हा मुलांना नशेच्या गोळ्या खाण्यास देतो त्यामुळे आमचे परिसरातील मुलांचे आयुष्य बरबाद होत आहे. तरी वरिल लोकांची योग्य चौकशी होवुन कायदेशीर कारवाई होणेस विनंती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT