Baba Ramdev
Baba Ramdev Saam Tv
मुंबई/पुणे

Baba Ramdev : योग, आयुर्वेदाविरोधात षडयंत्र रचलं जातंय; बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप

साम टिव्ही ब्युरो

Baba Ramdev News : योग, आयुर्वेद आणि स्वदेशी विरोधात मोठं षडयंत्र रचलं जातंय, योगाला बदनाम करण्यासाठी धार्मिक दहशतवाद कारणीभूत आहे. पतंजली आणि योगविरोधात उत्तराखंड मधून षडयंत्र सुरू केलं गेलं ज्याचा आम्ही पर्दाफाश केला, असा खुलासा करत बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी पत्रकारपरिषदेत गंभीर आरोप केले आहेत. बाबा रामदेव यांनी आज मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी हैराण करून सोडणारे खुलासे केले आहेत. (Baba Ramdev Todays News)

काय म्हणाले बाबा रामदेव?

योग गुरु बाबा रामदेव यांनी आज मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक गंभीर आरोप केले. योगाच्या बदनामीसाठी धार्मिक दहशतवाद कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पतंजलिने आतापर्यंत लाखो लोकांना रोजगार दिला. मात्र, आता काही लोक योग, आयुर्वेद आणि स्वदेशी विरोधात षडयंत्र रचत आहे. या षडयंत्राला उत्तराखंडमधून सुरूवात झाली आहे. असा आरोप बाबा रामदेव यांनी केलाय. (Baba Ramdev Latest News)

पतंजलीला आयपीओ बाजारात आणणार

पुढे बोलताना ते म्हणाले की, लवकरच आम्ही पतंजलीचा आयपीओ बाजारात आणणार आहे. याशिवाय पतंजली पाच नव्या कंपन्यांची स्थापना करणार आहे, यामध्ये पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस पतंजली मेडिसीन, पतंजली लाईफस्टाईल या कंपन्यांचा समावेश आहे. यामाध्यमातून अनेकांना रोजगार मिळणार आहे. असल्याचंही ते पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Godrej Family Tree : गोदरेज समुहात विभाजन, आता कोण सांभाळणार व्यवसाय? वाटणीत कोणाला काय मिळालं?

Today's Marathi News Live : राहुल गांधी यांच्या सभेच्या वेळेत बदल, ⁠राहुल गांधी सभास्थळी ६.३० वाजता येणार

Amit Shah: उद्धव ठाकरे नकली सेनेचे अध्यक्ष, बाळासाहेबांचे नाव घेऊ नये; अमित शहांची टीका

Sanjana Sanghi: संजनाच्या सौंदर्याचा जलवा; हटके लूकने वेधले लक्ष

Pimpri Chinchwad News : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; चार मुलींची सुटका

SCROLL FOR NEXT