Aditya Thackeray Speech : '50 खोके एकदम ओके हे महाराष्ट्रात सर्वत्र गेलेले आहे. खोके सरकार अजूनही आपलं काम दाखवू शकलं नाही', असं म्हणत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर निशाणा साधलाय. 'जिथे-जिथे स्थानिक आमदारांनी गद्दारी केली तिथे मी लोकांना जाऊन विचारत आहे की त्यांनी केल ते योग्य केल का? लोकं यांना गद्दारच म्हणत आहेत', असा टोलाही आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना लगावलाय. (Aditya Thackeray Latest News)
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांची निष्ठा यात्रा आज रत्नागिरीत येऊन धडकली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचं जल्लोषात स्वागत केलं. आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसेनेकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली. यावेळी 50 खोके एकदम ओकेच्या घोषणाही देण्यात आल्या.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळ आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. या सभेला शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की '50 खोके एकदम ओके हे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात प्रत्येक घरात गेलेलं आहे. कारण, त्यांना माहिती आहे त्यांना हे पटलेलं आहे की स्वत:ला 50 खोके आणि महाराष्ट्राला धोके अशीच परिस्थिती या आमदारांनी केली आहे'. (Aditya Thackeray News)
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की 'महाराष्ट्रात खोके सरकार स्थापन होऊन जवळपास अडीज ते तीन महिन्यांचा कालावधील उलटला. मात्र, तरी देखील हे सरकार एक सुद्धा असं काम ठळकपणे दाखवू शकलं नाही की ते आम्ही केलेलं आहे. काल परवा शिंदे सरकारने एक पत्रकारपरिषद घेतली, त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही मुंबईत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने 140 मोफत रुग्णालय सुरू करत आहोत. त्यांना मी सांगू इच्छितो की त्या दवाखान्याची कल्पना त्याचं बजेट हे मुंबई महापालिकेने दिलेलं आहे. उद्धव ठाकरेंचं हे स्वप्न होतं की मुंबईत आम्ही दवाखाने सुरू करू'
'मी आतापर्यंत सतत सांगत आलेलो आहे की हे गद्दारांचं सरकार आहे, बेईमानीचं सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठित खंजीर खुपसणारं सरकार आहे. हे सिद्ध करून दाखवतो असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलीच फटकेबाजी केली आहे. आम्ही जेव्हा 50 खोके एकमद ओकेच्या घोषणा देत होतो, तेव्हा हेच गद्दार आमदार आम्हाला येऊन विचारत होते की तुम्हाला 50 खोके पाहिजेत का? त्यामुळे त्यांनीच मान्य केलं आहे आपण 50 खोके घेतलेत. असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावलाय.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.