Viral News  Saam tv
मुंबई/पुणे

Viral News : चाललंय काय? रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जेवणात अळ्या, झुरळ; लोअर परेल वर्कशॉप कँटिनमधील धक्कादायक प्रकार

lower parel workshop Viral News : पश्चिम रेल्वेच्या लोअर परेलमधील वर्कशॉपच्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जेवणात अळ्या, झुरळ आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्कशॉपच्या कँटिनमध्ये हा धक्कदायक प्रकार घडला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : एका विद्यापीठाच्या मेसमध्ये चटणीच्या पातेल्यात जिवंत उंदीर टुणूक टुणूक उड्या मारत असल्याचा व्हिडिओ बुधवारी समोर आला. हैदराबादमधील हा धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या खळबळजनक घटनेनंतर आणखी एक असाच प्रकार मुंबईतून समोर आला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लोअर परेल वर्कशॉपमधील उपहारगृहातील जेवणात अळ्या, झुरळ आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पश्चिम रेल्वेच्या लोअर परेलमधील वर्कशॉपच्या उपहारगृहातील कर्मचाऱ्यांच्या जेवणात अळ्या आणि झुरळ दिसून आले आहे. या प्रकारानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी एकच संताप व्यक्त केला आहे. या संतापजनक प्रकारानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी उपहारगृह चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नेमकं काय घडलं?

लोअर परेलमधील रेल्वे वर्कशॉममध्ये उपहारगृहात बुधवारी ११ वाजता वाजता प्रशिक्षणार्थी रेल्वे कर्मचारी जेवण करत होता. हा कर्मचारी जेवण करत असताना त्याच्या भाजीत अळ्या दिसून आल्या. काही दिवसांपूर्वी नाश्ता करताना झुरळ आढळल्याचाही प्रकार घडला होता.

या प्रकारानंतर रेल्वे कर्मचाऱ्याने उपहारगृहात एकच संताप व्यक्त केला. त्यानंतर वर्कशॉपच्या मुख्य व्यवस्थापकांच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला. त्याचबरोबर उपहारगृह चालवणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, या वर्कशॉपच्या उपहारगृहात ७०० ते ८०० कर्मचारी जेवण करतात. या रेल्वे उपहारगृहाच्या जेवणात अळ्या, केस आणि झुरळ आढळण्याचे प्रकार घडू लागल्याने कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. उपहारगृहात या प्रकराच्या घटना वाढू लागल्याने कर्मचाऱ्यांकडून आरोग्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांची गटनेतेपदी निवड

Akola Mayor: अकोल्याला आज महापौर मिळणार, कोण बसणार खुर्चीवर? भाजप सत्ता कायम राखणार का?

Panchang Today: आज शुक्र प्रदोष व्रताचा संयोग! मिथुनसह चार राशींसाठी लाभदायक दिवस

Shahrukh Khan: चष्मा काढायला लावला, आयडी बघितला...; एयरपोर्टवर किंग खानची झाली चेकिंग, नेमकं कारण काय?

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! १२ फेब्रुवारीला मोठा निर्णय होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT