Worli Hit And Run Case  Saam Digital
मुंबई/पुणे

Worli Hit And Run Case : राजेश शहाच्या घरावर मुख्यमंत्री बुलडोजर चालवणार का? वरळी हिट अँड रन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल

Worli Hit And Run Case Update : आदित्य ठाकरे यांनी वरळीत अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी त्यांनी या प्रकरणातील आरोपीचे वडील राजेश शहा यांच्या घरावर बुलडोजर चालवणार का? असा सवाल केला आहे.

Sandeep Gawade

वरळीत रविवारी घडलेल्या हिट अँड रन प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. पुणे आणि वरळी येथील अनधिकृत बारवर प्रशासनाने बुलडोजर चालवले होते. त्यावरून आता शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री आता या प्रकरणातील आरोपीचे वडील राजेश शहा यांच्या घरावर बुलडोजर चालवणार का? असा सवाल केला आहे. शिंदेंनी मिहिर शहाचे वडील राजेश शहा यांना पदावरून काढलं, मात्र पक्षातून काढलेलं नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी वरळीत अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी त्यांनी वरळीची केस हिट अँड रनची नाही तर मर्डर केस म्हणून बघावी. कारण मृत महिलेना त्याने २ किमी कारसोबत फरफटत नेलं. ही घटना इतकी भयंकर होती की एक राक्षसच अस करू शकतो. तरीही ६० तास मिहिर शहाला त्यांनी केला आहे.

रविवारी पहाटे अपघाताची ही घटना घडली होती. भरधाव कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यांना धडक दिली होती. या अपघातामध्ये कावेरी नाखवा या महिलेचा कारसोबत फरफटत नेल्यात आलं होतं. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. मिहिर शहाच ही कार चालवत असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान मिहिर शहाला मंगळवारी अटक करण्यात आली होती. आज त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अपघाताच्या या प्रकरणावरून राजकारण तापलं असताना मुंबई महापालिकेने मोठी कारवाई केली होती. मिहिर शहा आणि त्याच्या मित्रांनी ज्या तापस बारमध्ये मद्यपान केलं तो सील केला होता. आज त्यावर बुलडोझर फिरवला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यावरून आज आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांना सवाल केला. मुख्यमंत्री या प्रकरणातील आरोपी मिहिर शहाचे वडील आणि त्यांच्या पक्षाचे नेते राजेश शहा यांच्या घरावर बुलडोजर चालववणार का? असा प्रश्न केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT