बदलापूरचा देवाभाऊ चष्मा आफ्रिका खंडात दाखल झाला आहे. आफ्रिका खंडातील ५५ देशांमध्ये ३३ रूपयांत देवाभाऊ चष्मा मिळणार आहे. इथिओपिआतील समीटमध्ये देवाभाऊ चष्म्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. हा देवाभाऊ चष्मा आहे तरी काय आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत...
नेपाळमधील १४० देशांच्या समिटमध्ये सादर झालेला जगातील सर्वात स्वस्त देवाभाऊ चष्मा आता आफ्रिका खंडात पोहचला आहे. बदलापुरच्या व्हिजन फ्रेंड साकिब गोरे संस्थेने ३३ रूपयांत सर्वात स्वस्त देवाभाऊ चष्मा बनवलाय. इथिओपियातील आदिस अबाबा इथं होत असलेल्या कोएत्सा समिटमध्ये हा चष्मा सादर करण्यात आला.
२० ते २२ ऑगस्ट दरम्यान या समिटचं आयोजन करण्यात आलं आहे. या समिटमध्ये आफ्रिका खंडातील टांझानिया, युगांडा, रवांडा, केनिआ, इथिओपिया, बुरूंडी, मलावी, झांबिया, साऊथ सुदान, झिम्बाब्वे, सोमालिया आणि मोझांबिक या १२ देशांचा समावेश आहे. या देशांसोबत आफ्रिका खंडातील जवळपास ५५ देशांमध्ये हा चष्मा अत्यंत कमी दरात उपलब्ध होणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, आफ्रिका खंडातील ७० टक्के लोकांमध्ये दृष्टीदोषाची समस्या आहे. चष्मा परवडत नसल्यानं अनेक लोक चष्म्यापासून वंचित आहेत. त्याचा परिणाम म्हणजे इथली क्रयशक्ती घटत आहे.
सामाजिक कार्यकर्ते साकिब गोरे यांनी आपल्या संस्थेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने देवाभाऊ चष्मा लॉन्च केला असून आता हा चष्मा आफ्रिका खंडातील गरजू लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. इथिओपियातील कोएत्सा समिटनंतर २६ ऑगस्टला ब्राझीलमधील साओ पावलो इथं तर ३ सप्टेंबरला हा चष्मा केनियातील नैरोबी इथं लॉन्च केला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.