world largest stepwell to be built in dehu Saam Digital
मुंबई/पुणे

Dehu : देहूत जगातील सर्वात मोठी पायऱ्यांची विहीर, बांधकामास प्रारंभ

world largest stepwell to be built in dehu : गेल्या 500 वर्षातील अशा प्रकारचा केला गेलेला पहिलाच जलसंधारण प्रयत्न आहे. ही पायऱ्यांची विहिर शाश्वत टाऊनशीप मध्ये साकारली जात आहे.

दिलीप कांबळे

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या श्री क्षेत्र देहू येथे जगातील सर्वात मोठी पायऱ्यांची विहिर साकारली जात आहे. साधारणतः 90 हजार क्युबिक मीटरच्या आकाराची ही विहीर असणार आहे. या विहिरीला 4 हजार पाचशे पायऱ्या असणार आहेत अशी माहिती भूमीपूजना प्रसंगी देण्यात आली.

या विहिरीच्या कामाचा शुभारंभ श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत नुकतेच झाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थितीत हाेते. ही विहीर तयार करण्याची कल्पना गुजरात आणि राजस्थान मधील पायऱ्यांची विहिरी पाहून सुचल्याचे सांगण्यात आले.

ही विहिर दोन जर्मन विद्यापीठांनी राबवलेल्या ऊर्जा आणि साठवलेल्या पाण्याचा पुनर्रवापर करून हे पाणी परिसरातील निवासी भागासाठी वापरात आणली जाणार आहे. साधारणतः 90 हजार क्युबिक मीटरच्या आकाराची ही विहीर बांधण्यात येईल. या विहिरीला 4 हजार पाचशे पायऱ्या असणार आहेत. विहिरीलगत निसर्गोपचार केंद्र व ध्यानधारणा केंद्र असणार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी ही विहिर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT