Worker Death Saam Tv News
मुंबई/पुणे

Worker Death: सेप्टिक टँक साफ करायला गेले अन् झाला घात, कामगाराचा गुदमरून मृत्यू

Worker Death in Bhayandar: सेप्टिक टँक साफ करण्यासाठी उतरलेल्या कामगाराचा जीव गुदमरल्यानं मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना भाईंदर पूर्वच्या नक्षत्र टॉवरमध्ये घडली असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

Bhagyashree Kamble

महेंद्र वानखेडे, साम प्रतिनिधी

सेप्टिक टँक साफ करण्यासाठी उतरलेल्या कामगाराचा, साफसाफाई करत असताना जीव गुदमरल्यानं मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना भाईंदर पूर्वच्या नक्षत्र टॉवरमध्ये घडली असून, यात एक मजुराची प्रकृती गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या प्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगाराचा असा दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भाईंदर पूर्वच्या गोल्डन वेस्ट परिसरात, नक्षत्र सोसायटीच्या सेप्टिक टँक साफ करण्यासाठी गेलेल्या २ कामगारांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा कामगाराची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. महिंद्रा कमळाकर पोंडकर (वय वर्ष ४७) असे मृत मजुराचे नाव असून, गणेश उत्तम आवटे (वय वर्ष ३५) यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

सेप्टिक टँक साफ करताना कामगाराच्या अंगाला दोरी बांधण्यात आली होती. त्यानंतर मजूर टँकमध्ये शिरला. त्यांच्यासोबत आणखीन एक कामगार होता. मात्र, अचानक दोघांचा जीव गुदमरला. ज्यात महिंद्रा यांचा जीव गुदमरल्यानं झाला तर, गणेश यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या दुर्देवी घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मृत कामगाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आक्समित मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून, कुणाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे का? याचा तपास नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज कोळी करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

SCROLL FOR NEXT