Mira Bhayandar : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला भररस्त्यात चोपलं, VIDEO

Beat Up Man For Harassing Girl : मिरा भाईंदर येथे एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला आहे. तसंच या आरोपीची धिंड देखील काढण्यात आली आहे.

काशीमिरा परिसरात अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला स्थानिकांनी पकडून चांगलाच चोप दिला आहे. आरोपीला अर्धनग्न करत त्याची धिंड काढून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. हा आरोपी गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. हा सर्व प्रकार मुलीने पालकांना सांगितला. त्यानंतर स्थानिकांनी या आरोपीला पकडून त्याला चोप दिला आहे.

मिरा भाईंदरच्या काशीमिरा परिसरात एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला स्थानिकांनी चांगलाच चोप दिला आहे. हा आरोपी गेल्या काही दिवसांपासून मुलीचा पाठलाग करत होता. ही बाब मुलीने पालकांना सांगितल्यावर त्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्याला पकडून चांगलाच चोप दिला. इतकंच नाही, तर त्याची अर्ध्या किलोमीटर अर्धनग्न करत धिंड देखील काढली आहे. काशीमिरा पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com