Gang Sexual Assault On Women Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai: मुंबईतील महिला असुरक्षितच, भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती

अल्पवयीन मुलीकडे पाहून अश्लील शेरेबाजी केली आरोपी एवढ्यावरच न थांबता आरोपीने तिच्याशी जबरदस्तीही करण्याचा प्रयत्न केला.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईतही (Mumbai) महिला असुरक्षितच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. अंधेरी MIDC येथे १४ वर्षीय शाळकरी मुलीची भर रस्त्यात छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतून (School) घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलींना पाहून अश्लील चाळे व शेरो-शायरी करणाऱ्या नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे.

रवी राजेंद्र प्रसाद शर्मा असे या आरोपीचे नाव आहे. चेंबूरच्या मुक्तानंद हायस्कूल जवळ ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी आरोपी रवि शर्मावर चेंबूर पोलिस ठाण्यात ३५४ (अ), ५०८ भादंवि सह कलम १२ पोक्सो अंतर्गत गुन्हा पोलिसानी नोंदवला आहे.

तर अंधेरी MIDC येथे १४ वर्षीय शाळकरी मुलीची भर रस्त्यात छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलगी पुनम नगर येथील मातोश्री गार्डन येथील बस स्टॉप येथून जात असताना आरोपीने मुलीकडे पाहून अश्लील शेरेबाजी केली.

आरोपी एवढ्यावरच न थांबता आरोपीने तिच्याशी जबरदस्तीही करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पिडीत महिलेच्या तक्रारीवरून ३५४, ५०६ भादवी कलमांसह ८,१२, पोस्को अॅक्ट २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ -

राज्यात सध्या महिलांच्या अत्याचाऱ्यांच्या घटना वाढल्या आहेत. भंडारा (Bhandara) येथे एका महिलेवर बलात्कार करुन तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच. आता मुंबईत देखील मुलीची छेडछाड काढलाने मुली मुंबईत तरी सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: चतुर्थीच्या योगात आज चार राशींच्या नशिबाचा तारा चमकणार! पाहा तुमची रास आहे का?

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर

DK Rao Arrest : दाऊदचा कट्टर दुश्मन, गँगस्टर डीके रावच्या मुसक्या आवळल्या, कारण काय ?

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

SCROLL FOR NEXT