भंडारा: मदतीचे आश्वसान देऊन भंडाऱ्यात ३५ वर्षीय महिलेवर भंडारा (Bhandara) आणि गोंदिया (Gondia) जिल्ह्यात दोन आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन केला अत्याचार (Sexual Assault) केल्याची घटना धक्कादायक घडली आहे. एवढंच नाही तर, अत्याचारानंतर पीडितेला रस्त्याकाठी फेकण्यात आलं. पीडितेवर सध्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असून याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे. (Bhandara Crime News)
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही तिच्या पतीपासून विभक्त राहत असून नकुतीच गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे बहिणीकडे राहत होती. दरम्यान ३० जुलैला बहिणासोबत भांडण झाल्याने तिने रात्रीच्या सुमारास घर सोडले. त्यानंतर भंडारा जिल्ह्यात आईकडे जाणासाठी ती घरातून निघाली. घरातून बाहेर निघाल्यानंतर प्रथम दर्शनी संशयित आरोपीने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. त्यानंतर गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तर दुसऱ्या दिवशी ३१ जुलैला पळसगांव जंगलात नेऊन अत्याचार केला. यानंतर आरोपींनी या महिलेला जंगलातच सोडून दिले आणि पळ काढला.
या पाशवी अत्याचारानंतर पीडिता जंगलातून निघून लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह येथे पोहचली. याठिकाणी असलेल्या धर्मा ढाब्यावर पोहचली असता तिथे तिची दुचाकी दुरुस्त करणाऱ्या आरोपी क्रमांक दोन सोबत भेट झाली. तिथे त्यानेही घरी सोडून देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक केली आणि त्याच्या मित्रासोबत १ ऑगस्टला अत्याचार केले. या अत्याचारांनंतर कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळमोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजेच्या सुमारास महिलेला विवस्त्र अवस्थेत सोडून आरोपींनी पळ काढला. ही पीडित महिला नागरिकांना दिसताच पोलिसांनी महिलेला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणी केली असता महिलेवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारांकरिता नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालयात हलविले आहे.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. या आरोपींविरुद्ध कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कारधा पोलिस करीत आहेत. या संपूर्ण गुन्हात 3 संशयित आरोपींचा समावेश आहे, सध्या २ आरोपींना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे.
या गुन्हाची सुरुवात गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव येथे झाल्याने भंडारा पोलिसांनी गोरेगाव पोलिसांना 2 संशयित आरोपींसह गुन्हाचा तपास वर्ग केला आहे. हे दोन संशयित आरोपी गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात असून आणखी एका अज्ञात फरार आरोपीचा शोध गोंदिया पोलिस घेत आहे. तसेच संपूर्ण तपास हा गोंदिया पोलिस करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.