Mumbai Cat News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : मांजराला खायला दिलं म्हणून शेजाऱ्यांची तरुणीला बेदम मारहाण, हाताला पडले तब्बल 32 टाके

Crime News : सिमरीन शुक्ला असं मारहाण झालेल्या तरुणीचं नाव आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : मांजराला खाऊ घातल्याच्या कारणावरुन एका तरुणीला शेजाऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत तरुणीच्या हाताला 32 टाके पडले आहेत. मुंबईतील भुलेश्वर येथे ही घटना घडली आहे. सिमरीन शुक्ला असं मारहाण झालेल्या तरुणीचं नाव आहे. या प्रकरणी सिमरीनच्या वतीने पोलिसांत राजकुमार मिश्रा आणि त्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर मिश्रांकडून तरुणीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सिमरीन परिसरातील मांजरांना नेहमी खायला देत असे. मात्र मांजरी आपल्या घरासमोर घाण करत असल्याची तक्रार मिश्रा कुटुबियांची होती. याबाबत सिमरीन आणि मिश्रा कुटुंबियांमध्ये याआधीही खटके उडाले होती. मात्र अशाच झालेल्या वादातून मिश्रा त्याच्या कुटुंबियातील दोघांना सिमरीनला बेदम मारहाण केली.  (Latest Marathi News)

या मारहाणीनंतर सिमरीनच्या हातातून आणि पायातून रक्तस्त्रावही झाला. तिच्या हाताला 32 टाके पडले आहेत. त्यानंतर जस्ट स्माइल चॅरिटेबल ट्रस्टच्या स्नेहा विसारिया यांच्या मदतीन तिने एफआयआर दाखल केला आहे. यानंतर मिश्रा कुटुंबियांनी देखील त्यांच्यावर हल्ला केल्याची काउंटर तक्रार दाखल केली आहे. मात्र शुक्रवारी रात्री मिश्रांवर हल्ला करणारे हे लोक कोण होते हे स्पष्ट झालेले नाही. (Mumbai News)

चार दिवसांपूर्वी सिमरीनच्या 14 वर्षांच्या भावावरही मांजरांना खाऊ खालण्यावरून त्याच शेजाऱ्यांनी मारहाण केली होती, असं विसारिया यांनी सांगितलं. (Crime News)

सिमरीनने सांगितलं की, मिश्रांनी माझ्यावर हल्ला केला आणि त्यामुळे माझ्या हाताला टाके पडले. मांजरांना खायला दिल्याबद्दल आम्हाला बराच काळ त्रास दिला जात होता. काउंटर एफआयआर चुकीचा आहे. कारण आमचा यात कोणत्याही प्रकारे सहभाग नाही.

पोलिसांनी याबाबत म्हटलं की, दोन्हीकडून काउंटर तक्रार नोंदवण्यात आल्या आहेत. गुन्हा गंभीर नसल्यामुळे कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT