Sanjay Raut News : मुंबई देशाची आर्थिक राजधानी खरंच आहे ना? PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर संजय राऊतांचा फडणवीसांना प्रश्न

Political News : टेक कंपनी गुगलने केलेल्या महत्त्वाच्या कराराची सध्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Sanjay Raut News
Sanjay Raut News Saam TV
Published On

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर भारताला यातून काय मिळालं, याची चर्चा सध्या सुरु आहे. हजारो करोड रुपयांचे अनेक करार या दौऱ्यात झाल्याचं माहिती समोर येत आहे. यामध्ये टेक कंपनी गुगलने केलेल्या महत्त्वाच्या कराराची सध्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Google भारताच्या डिजिटायझेशनमध्ये 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. याचं सेंटर गुजरातमध्ये असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात काय मिळालं असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'देवेंद्रजी... हे खरे आहे...? मोदीजी अमेरिकेला गेले. तेथे एकमेव गुंतवणूक करार केला तो फक्त आपल्या गुजरातसाठी. महाराष्ट्राला काय मिळाले? घंटा! मुंबई देशाची आर्थिक राजधानी खरंच आहे ना? दया.."कुच्छ "तो गडबड हैं.'

Sanjay Raut News
Maharashtra Politics: काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी ऑफर दिली तरी पंकजा मुंडे कुठेही जाणार नाहीत - रावसाहेब दानवे

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीत सांगितलं की, हे एक पाऊल आहे जे फिनटेकच्या मुद्द्यावर भारताच्या नेतृत्वाला एक ओळख निर्माण करुन देईल. भारत आणि अमेरिकेसह जगभरातील लहान आणि मोठ्या व्यवसायांना पुढे नेण्यात यामुळे मदत होईल. (Latest Marathi News)

Sanjay Raut News
India Rain Update: देशभरात मान्सून सक्रिय; आज अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

काय म्हणाले पिचाई?

सुंदर पिचाई यांनी गांधीनगरमधील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी (GIFT) येथे Google चे ग्लोबल फिनटेक ऑपरेशन्स सेंटर सुरू करण्याची घोषणा केली. पिचाई यांनी सांगितलं की, Google भारताच्या डिजिटायझेशन फंडमध्ये 10 अब्ज डॉलर गुंतवणूक करत आहे. आम्ही गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये आमचे ग्लोबल फिनटेक ऑपरेशन्स सेंटर उघडण्याची घोषणा करत आहोत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com